नवापूरात रंगली ‘स्मार्ट लेडी’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:20 PM2018-03-19T12:20:54+5:302018-03-19T12:20:54+5:30
सांस्कृतिक कार्यक्रम : मेघा बिरारीस ठरल्या स्मार्ट लेडी
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 19 : शहरातील अस्तित्व ग्रुपतर्फे आयोजित स्मार्ट लेडी स्पर्धेत मेघा बिरारीस यांनी बाजी मारली. चांदीचा मुकुट व पैठणी साडी देऊन त्यांना गौरविण्यात आले. पालिकेच्या सुरूपसिंग नाईक बहुद्देशीय भवनात झालेल्या या स्पर्धेत महिलांसाठी नृत्य, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आल़े
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, डॉ़ तेजल शहा, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक संगिता कदम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली़
नृत्य स्पर्धेत महिलांच्या 12 संघ सहभागी झाल़े बेटी बचाव, कौटुंबिक जबाबदारी व मुलींचे शिक्षण या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. सौंदर्य, नृत्य व संगीत स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला व त्यांच्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक अंजू दुसाणे केल़े सूत्रसंचलन सिमा पाटील यांनी तर आभार संगिता सोनार यांनी मानले. यशस्वितेसाठी मृदुला भांडारकर व मिनाक्षी सोनार यांच्या मार्गदर्शनात प्रियंका पाटील, विजया सोनार, विद्या सोनार, जयश्री चव्हाण, जयश्री पाटील व अस्तित्व गृपच्या महिला सदस्यांनी परिश्रम घेतल़े दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करुन अस्तित्व ग्रुपने वेगळेपण जपले आहे. यावर्षी स्मार्ट लेडी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे आकर्षण होत़े स्पर्धेत 15 महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला़ त्यात सर्वसाधारण गृहिणी व नोकरी करणा:या महिलांचा त्यात समावेश होता़ तीन फे:यांमध्ये अंतिम विजेत्याची निवड झाली. अंतिम फेरीत पहिले तीन क्रमांक ठरविण्यात आलेत. त्यात प्रथम क्रमांक पटकावून मेघा बिरारीस स्मार्ट लेडी ठरल्या. द्वितीय प्रतिभा पवार व तृतीय बक्षिस रूपाली जगताप यांना देण्यात आल़े महिलाच्या पुढाकाराने महिलांसाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत़े महिलांकडून प्रत्येक कामाचे नियोजन करून कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़