जुगार खेळणारे नऊ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:36 PM2020-04-19T12:36:14+5:302020-04-19T12:36:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या काळात अनेक ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने शहर पोलिसांच्या पथकाने दोन ठिकाणी धाडी टाकल्या. वाघेश्वरी चौफुलीवरील वाहन विक्रीच्या शोरुम्सच्या बाजुला सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून रोख रक्कम व जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
याप्रकरणी पावबा नानू देवरे, रा.माळीवाडा, किशोर तेजमल सिंधी रा.सिंधी कॉलनी, यवंत रणछोड चौधरी रा.देसाईपुरा व सुरेश पुंडलीक वाघ रा.आंबेडकर चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी बलविंद्र ईशी यांनी फिर्याद दिली.
दुसरी घटना शहरातील भाटगल्ली भागातील मंदीरामागे घडली. या ठिकाणी टाकलेल्या धाडीत मुकेश मोतिराम चौधरी, रा.भाटगल्ली, मनिष सतिष सूर्यवंशी, हरिष सुरेश परदेशी रा.देसाईपुरा, सचिन आत्माराम ठाकुर रा.राजेंद्रनगर व मनोज मराठे रा.देसाईपुरा यांंच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी सुनील येलवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास फौजदार पी.ए.महाले व जमादार ठाकरे करीत आहे.