नऊ हजार क्विंटल तांदूळ दिला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:30 PM2020-04-18T12:30:11+5:302020-04-18T12:31:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात गरीब, सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या ...

Nine thousand quintals of rice was given free | नऊ हजार क्विंटल तांदूळ दिला मोफत

नऊ हजार क्विंटल तांदूळ दिला मोफत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात गरीब, सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या हक्काचे धान्य त्यांच्यार्पयत पोहचावे यासाठी युद्धपातळीर काम सुरू आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अवघ्या दोन दिवसात 38 हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल नऊ हजार क्विंटल तांदुळ मोफत वितरीत करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले, प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 38 हजार शिधापत्रिकाधारकांना नऊ हजार 161 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.  सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापयर्ंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील दोन लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना पाच किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निदेर्शानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820 क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभाथ्र्यास 15 किलो गहू दोन रुपये प्रति किलो दराने व 20 किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते.
जिल्ह्यात एकूण 88 टक्के कार्डधारकांना नियमित धान्याचे वितरण करण्यात आले आहे. नियमित धान्य घेतल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो याप्रमाणे सदस्यसंख्येनुसार तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तांदूळाचे वितरण सुरू करण्यात आले असून आतापयर्ंत अक्कलकुवा तालुक्यातील 52 शिधापत्रिका धारकांना 1,181 किलो, अक्राणी 562 शिधापत्रिका धारकांना 17.8 क्विंटल, नंदुरबार 13,567 शिधापत्रिका धारकांना 318 क्विंटल, नवापूर 5,649 शिधापत्रिका धारकांना 125 क्विंटल, शहादा 11 हजार 11 शिधापत्रिका धारकांना 283 क्विंटल आणि तळोदा तालुक्यातील 7,160 शिधापत्रिका धारकांना 169 क्विंटल तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे. अंत्योदय योजनेतील 13 हजार 747 शिधापत्रिका धारकांना 341 क्विंटल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 24,557 शिधापत्रिका धारकांना 574 क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे.
धान्य वितरण नियमानुसार होण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वितरणस्थळी भेटी देत आहेत. याशिवाय जि.प. शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक, केंद्र अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची पर्यवेक्षणाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. धान्य वितरणाचे वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. गरजूना नियमानुसार धान्य मिळावे याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जात असून आतापयर्ंत नियमानुसार वितरण न करणा:या दोन दुकानदारांचे परवाने आतापयर्ंत रद्द करण्यात आले आहे.

Web Title: Nine thousand quintals of rice was given free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.