नंदुरबारात सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:37 PM2018-03-20T12:37:49+5:302018-03-20T12:37:49+5:30

The Niratta movement in Nandurbarata by the Sukanu Samiti | नंदुरबारात सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन

नंदुरबारात सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 20 :  शेतक:यांच्या सरसकट कजर्मुक्तीसह इतर विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीतर्फे सोमवारी एकदिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिका:यांसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
सकाळी 11 वाजेपासून शेकडोजण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बसले होते. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे. सरसकट कजर्मुक्ती जाहीर करण्यात यावी. याअंतर्गत कर्ज रक्कम मर्यादेची असलेली अट रद्द करावी. वनहक्क कायदा 2006 च्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणावी. रेडिरेकनरनुसार तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे. दुधाचे भावाबाबत शेतक:यांची लूट सुरू आहे ती बंद करावी. ऊस भावासाठी गुजरात पॅटर्न लागू करावा. कापूस बोंडअळीने बाधीत तसेच अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यामुळे शेतक:यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी. शेतीसाठी मोफत वीज द्यावी. कांद्यासह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी विनाअट उठवावी आदींसह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. 
यावेळी विविध शेतकरी संघटनांचे पदाधिका:यांमध्ये काथा वसावे, करणसिंग कोकणी, भिमसिंग वळवी, अरुण रामराजे, नाना ठाकरे, लिलाबाई वळवी, सिंगा वळवी, विक्रम गावीत, वासुदेव गांगर्डे, होमाबाई गावीत, संजय पाटील आदींसह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.    

Web Title: The Niratta movement in Nandurbarata by the Sukanu Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.