शेवटच्या दिवशी नामनिर्देशनाची चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:50 PM2017-09-23T12:50:56+5:302017-09-23T12:50:56+5:30
लोकनियुक्त सरपंचपदासाठी 167 इच्छुक : सदस्यपदासाठी 925 उमेदवाराचे अजर्
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर/शहादा/अक्कलकुवा/ नंदुरबार : 51 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत शुक्रवारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चारही तालुका मुख्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती़ गर्दीमुळे तहसील कार्यालयांना यात्रेचे स्वरूप आले होत़े अक्कलकुवा, शहादा, नवापूर, आणि नंदुरबार या तहसील कार्यालयांमध्ये सकाळी 10 वाजेपासून कामकाज सुरू होताच, विविध राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेल्या पॅनलचे सरपंच आणि सदस्य पदासाठी इच्छुक यांच्याकडून नामनिर्देशन दाखल करण्याची चढाओढ सुरू होती़
शुक्रवारी दिवसभरात 51 ग्रामपंचायतींच्या 504 सदस्यपदासाठी 925 तर 51 लोकनियुक्त सरपंच पदासाठी 167 इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केल़े तत्पूर्वी गुरूवारी 51 ग्रामपंचायतीत 185 प्रभागाच्या 504 जागांसाठी 208 तर सरपंच पदासाठी 27 नामनिर्देशन दाखल होत़े गुरूवारी सुटी रद्द झाल्याची माहिती नसल्याने केवळ नंदुरबार तालुक्यात 21 तर नवापूर तालुक्यात 26 नामनिर्देशन दाखल झाले होत़े शुक्रवारी शेवटच्या दिवशी यात चारपट वाढ झाली़ राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पॅनलप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी त्या-त्या तहसील कार्यालयांत हजेरी लावत आपपल्या पॅनलच्या इच्छुक सदस्य आणि सरपंच यांचे नामनिर्देशन निवडणूक अधिका:यांच्या सूपूर्द केल़े
नवापूर
तालुक्यात 12 ग्रामपंचायतीच्या 108 सदस्य आणि 12 लोकनियुक्त सरपंचपदासाठी एकूण 323 नामनिर्देशन दाखल करण्यात आले होत़े लोकनियुक्त सरपंचपदासाठी 51 तर सदस्य पदासाठी 271 नामनिर्देशन दाखल करण्यात आल्याची माहिती आह़े यातही गंगापूर आणि वाटवी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
अक्कलकुवा
तालुक्यात 15 ग्रामपंचायतीच्या 276 सदस्यपदासाठी 350 आणि लोकनियुक्त सरपंच पदासाठी 45 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले होत़े तालुक्यातील मोलगी, भगदरी, खापर आणि अक्कलकुवा या चार मोठय़ा ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करणा:या इच्छुकांची गर्दी झाल्याने याठिकाणी रात्री उशिरार्पयत गर्दी होती़ मोलगी ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 63 तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी 17 इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केल्याची माहिती देण्यात आली आह़े
शहादा
तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या 21 लोकनियुक्त सरपंच तर 46 सदस्यपदासाठी 87 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ यात कळंबू येथे लोकनियुक्त सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी 17, खैरवे-भडगाव येथे सरपंच पदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 15, निंभोरा सरपंच 2 आणि सदस्य पदासाठी 14, बिलाडी त़ह येथे सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 13, धांद्रे येथे सरपंच पदासाठी सात आणि सदस्य 12, बहिरपूर 3 सरपंच तर सदस्यपदासाठी 13 नामनिर्देशन दाखल झाले होत़े यापूर्वी दोन अर्ज सरपंच आणि चार सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले होत़े आता लक्ष माघारीकडे लागले आह़े