उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : ई-रिसोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 07:48 AM2017-10-04T07:48:29+5:302017-10-04T07:48:34+5:30

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल नॉलेज सेंटर अंतर्गत ई-रिसोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे़ आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा उपयोग घेतला आहे.

North Maharashtra University: The increasing trend of students in e-resorts | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : ई-रिसोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : ई-रिसोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

Next

संतोष सूर्यवंशी/ नंदुरबार : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल नॉलेज सेंटर अंतर्गत ई-रिसोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा उपयोग घेतला आहे. गेल्या अर्थसंकल्पात ई-रिसोर्स योजनेसाठी २५ लाखांच्या निधीच्या अतिरिक्त तरतूद करण्यात आली होती. या माध्यमातून ही योजना फलद्रूप झाल्याचे म्हटले जात आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे़ विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तकांसह विद्यापीठ प्रशासनाकडून ई-रिसोर्सेस ही संकल्पना निर्माण करण्यात आली होती़ याअंतर्गत विद्यार्थी करीत असलेले संशोधन व अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ या ई-रिसोर्सेसमध्ये शोधणे अधिक सोयीचे होत आहे.

विद्यापीठात अनेक विद्यार्थी संशोधन करीत आहेत़ त्याच प्रमाणे क्रमिक अभ्यासक्रमातही अनेक वेळा अभ्यासासाठी इतर संदर्भ पुस्तकांची आवश्यकता विद्यार्थ्यांना भासत असते़ सर्वच विद्यार्थ्यांना ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून संदर्भ काढणे शक्य होत नाही़ त्यामुळे ई-रिसोर्सेसचा वापर करुन विद्यार्थी त्यांना लागणारे संदर्भ विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या ‘आयपी अ‍ॅड्रेस’वरून सर्च करू शकतात़ यामुळे विद्यार्थ्यांनी संगणकाला दिलेल्या कमांडनुसार पुस्तकांची यादी शोधण्यास मदत होते़ ई-रिसोर्सेसमुळे केवळ पुस्तकेच नाहीत तर इतर संशोधनकर्त्यांचे प्रबंध त्यांचे लेख आदींचाही शोधकर्त्यांना उपयोग होणार आहे. त्यामुळे ई-रिसोर्सेसला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे ग्रंथालय विभागप्रमुख अनिल चिकाटे यांनी सांगितले आहे.

निधीत वाढ केल्याचे फलित
विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ़ पी़पी़ पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहे़ त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात पुस्तकांच्या खरेदीसाठी ७५ लाख तर ई-रिसोर्सेससाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ मागील अर्थ संकल्पात ई-रिसोर्सेससाठी केवळ २५ लाखांचीच तरतूद करण्यात आली होती. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना काय हवे आहे ही गरज ओळखत ई-रिसोर्सेसला अधिक भक्कम करण्यासाठी आणखी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. म्हणजे एकूण ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. डिजिटल नॉलेज सेंटर अंतर्गत असलेल्या ई-रिसोर्सेसमधील किती संदर्भांना विद्यार्थ्यांनी भेट दिली? कुठल्या संदर्भांचा सर्वाधिक वापर केला जात आहे? कुठले संदर्भ सर्वाधिक कमी पाहिले जातात? याचा लेखाजोखा आॅरिऐंटेशन प्रोग्रामव्दारे ठेवला जातो़, अशी माहिती मिळाली.

वाङ्मय चौर्याचीही होतेय पडताळणी
विद्यार्थी संशोधन करीत असताना त्यांना आपल्या विषयाशी निगडित असलेला प्रबंध सादर करावा लागत असतो़ परंतु काहींकडून इतर संशोधकांच्या प्रबंधातील काही संदर्भ चोरुन ते स्वत: त्यांचे आहे असे भासविण्यात येत असते़ या वाङ्मय चौर्यावर नजर ठेवण्यासाठी े युजीसी मार्फत विद्यापीठाला ‘उरकूंड’ हे सॉफ्टवेअर देण्यात आले आहे़ त्याअंतर्गत ग्रंथालयाकडून प्रबंधांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती चिकाटे यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुख्य ग्रंथालय इमारतीत डिजिटल नॉलेज सेंटरअंतर्गत ई-रिसोर्सेस सुरू करण्यात आले आहे़ याचा मोठ्या संख्येने विद्यार्थी उपयोग करीत असल्याने समाधान आहे़ विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू असल्याने त्यांच्यात वाचन संस्कृती रुजविण्यास यामुळे मदत होणार आहे - -डॉ. पी.पी. पाटील, कुलगुुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

हजारो विद्यार्थ्यांना फायदा
ई-रिसोर्सेसचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा होत आहे़ विद्यापीठात एकूण १३ स्कूल्स तर त्याअंतर्गत ५२ विभाग आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठ्या संख्येने विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयात असलेल्या ई-रिसोर्सेसचा वापर करण्यात येत आहे़
भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक सोयीसुविधादेखील या ई-रिसोर्सेस अंतर्गत उपलब्ध होणार आहेत.

Web Title: North Maharashtra University: The increasing trend of students in e-resorts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.