विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच व्हावी
By admin | Published: April 1, 2017 04:57 PM2017-04-01T16:57:17+5:302017-04-01T16:57:17+5:30
सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे.
27 वर्षापासून विकासाचा पाठपुरावा : सातपुडाही मुख्य प्रवाहात येत असल्याचा आमदारांना विश्वास
नंदुरबार : सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे. येथील अनेक प्रश्न कायद्याच्या गुंतागुंतीत अडकल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी अधिक वेळ द्यावा लागला असला तरी कायद्याचे अडथळे दूर झाल्याने विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षातच सातपुडा निश्चितच पुर्णत: बदलून समाजाच्या मुख्य प्रवाहात विकासाच्या पथावर वाटचाल करतांना दिसेल असे मत आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.
आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार अॅड.पाडवी यांनी विविध बाबींवर दिलखुलास चर्चा केली. त्यांनी सांगितले, आपण विद्यार्थी दशेपासून संघटनात्मक काम करीत आहोत. नंदुरबारातील जीटीपी महाविद्यालयात शिकत असताना विद्यापीठाच्या सी.आर.पदासाठी थेट निवडणूक लढविली. त्यावेळी केवळ एका मताने आपला पराभव झाला. आदिवासी दुर्गम भागातून येणारा युवक एवढे यश मिळवू शकतो ही भावना प्रबळ झाली आणि तेथून आपल्या संघर्षमय जिवनाला सुरुवात झाली.
संघर्षाला सुरुवात
याच काळात अर्थात 1977 मध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. तिचे नेतृत्व माङयाकडे देण्यात आले. या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्याचे अनेक प्रश्न, समस्या सोडविता आल्या, त्यांना न्याय देता आला. त्यानंतर एलएलबीसाठी पुणे येथे गेलो. या माध्यमातून सेवादलाच्या लोकांशी तसेच अनेक प्रभावी राजकारणी, विचारवंत यांच्याशी संपर्क आला. विद्यापीठ नामांतर लढय़ात रामदास आठवले यांच्यासोबत तुरुंगात गेलो. धुळे येथे वकिलीची प्रॅक्टीस करीत असताना 1989 मध्ये जनता दलातर्फे थेट लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळाले. कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना केवळ तरुणाईच्या पाठबळावर आणि स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सहकार्याने पहिल्याच निवडणुकीत तब्बल एक लाख 35 हजार मते मिळविली. हाच प्रचार आणि अनुभव 1990 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कामी आला. जनता दलातर्फेच अक्राणी मतदारसंघात निवडणूक लढवून मोठय़ा मताधिक्याने विजयी झालो. तेव्हापासून सातपुडय़ाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी अंगावर आली. लोकांची केलेली कामे, जोडून ठेवलेल्या कार्यकत्र्याच्या बळावर आपण 27 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.