वाळू वाहतूक प्रकरणी 46 जणांना नोटीसा : तळोदा तहसील प्रशासनाकडून कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:35 PM2018-02-10T12:35:53+5:302018-02-10T12:36:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहर व तालुक्यातून विना परवाना वाळू वाहतूक करणा:या 46 जणांना तहसीलदार यांनी नोटिसा बजावल्या आहेत़ तालुक्यातून वाळू वाहतूक वाढल्याने तहसील कार्यालय प्रशासनाकडून सध्या धडक कारवाई सुरू आह़े
तळोदा तालुक्यालगत गुजरात हद्द व दुर्गम भागातून वाहून येणा:या नदी नाल्यांमधून विनापरवाना व अवैध वाळू वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आह़े परिणामी शासनाच्या महसूलावर परिणाम होत आह़े यामुळे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मोहिम उघडली आह़े याअंतर्गत गुरूवारीही अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून संबधित मालकाकडून दोन लाख 24 हजार 700 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ या कारवाईमुळे वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून हातोड, सज्जीपूर मार्गाने शहरात येणारी वाळू बहुरूपा मार्गाने शहराबाहेर जात असल्याचे सांगण्यात आले आह़े शहरात वाळू मिळत नसल्याने बांधकाम करणा:यांचे हाल होत असून बांधकाम ठेकेदारही त्रस्त झाले आहेत़ परवानाधारकांकडे वाळूचा तुटवडा असल्याने निर्माण झालेल्या समस्येवर मार्ग काढण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आह़े प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कारवाई झाल्याने परवानाधारक व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आह़े प्रशासनाकडून शहरातील विविध मार्गावर गस्त घालण्यात येत आह़े