वाळू तस्करीप्रकरणी प्रशासनातर्फे ठेकेदाराला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:43 PM2018-06-16T12:43:41+5:302018-06-16T12:43:41+5:30

सिमावर्ती भागातील गोंधळ : दोन्ही राज्यातील जिल्हाधिका:यांची समन्वय बैठक लवकरच

Notice to contractor by the administration of sand smuggling | वाळू तस्करीप्रकरणी प्रशासनातर्फे ठेकेदाराला नोटीस

वाळू तस्करीप्रकरणी प्रशासनातर्फे ठेकेदाराला नोटीस

googlenewsNext

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर होणा:या वाळू तस्करीप्रकरणी जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात महाराष्ट्रातील सावळदा येथील ठेकेदाराला कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ही तस्करी रोखण्यासाठी दोन्ही राज्यातील अधिका:यांची बैठक लवकरच होणार आहे.
जिल्ह्यातील गुजरातच्या सिमावर्ती भागात मोठय़ा प्रमाणावर वाळू तस्करी होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. राजरोसपणे या ठिकाणी वाळूची वाहतूक होत असून त्याचा नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही राज्याच्या सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील सावळदा येथील वाळू ठेक्याचा नावाने गुजरातमधून वाळू वाहतूक होत असल्याची तक्रार असून याबाबत स्थानिक प्रशासनाने यापूर्वी सव्र्हेक्षणही केल्याचे वृत्त आहे. या ठिकाणाच्या नावाने जेवढी वाळू काढली गेल्याची नोंद आहे प्रत्यक्षात तेवढे खोदकाम सावळदा ठेक्याच्या ठिकाणी झाले नसल्याचे प्रशासनाने यापूर्वीही अहवाल दिला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी अधिकारी सव्र्हेक्षणाला गेले त्यावेळी त्या ठिकाणी वाळू काढणारी कुठलीही यंत्रणा दिसून आली नव्हती. असे असतांनाही त्या नावाने शेकडो          ब्रास वाळू वाहतूक झाल्याने           तेथील ठेका रद्द करण्याबाबत यापूर्वी अहवाल दिला होता. असे असतांनाही गेल्या महिनाभरापासून त्याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे.  याबाबत अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी संबधीत ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यावर समाधानकारक उत्तर न आल्यास गंभीर कारवाईचे संकेत दिले आहेत. 

Web Title: Notice to contractor by the administration of sand smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.