आठ मिठाई विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाची नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:32 PM2018-11-02T13:32:11+5:302018-11-02T17:47:24+5:30

नंदुरबार : अन्न व सुरक्षा विभागाकडून जिल्ह्यातील आठ मिठाई विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ व्यावसायिकांकडे 10 मिठाई नमुने हे ...

Notice of Food and Drug Administration to eight sweet marketers | आठ मिठाई विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाची नोटिस

आठ मिठाई विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाची नोटिस

Next

नंदुरबार : अन्न व सुरक्षा विभागाकडून जिल्ह्यातील आठ मिठाई विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ व्यावसायिकांकडे 10 मिठाई नमुने हे खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई झाली आह़े 
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने चार दिवसांपासून तपासणी मोहिम हाती घेतली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील 18 परवानाधारक मिठाई विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थाची  पडताळणी करण्यात येत होती़ यात आठ विक्रेत्यांकडील 10 मिठाईचे नमुने हे अयोग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश तांबोळी यांनी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत़ दरम्यान हे नमुने पूर्णपणे दूषित आहेत किंवा कसे याचा अहवाल येत्या आठवडय़ात प्राप्त होणार आह़े अहवालात विक्रेते दोषी आढळल्यास फौजदारी कारवाईसह दंडाची शिक्षा होणार असल्याची माहिती आह़े अहवालाकडे विक्रेत्यांसह नागरिकांचेही लक्ष लागून आह़े 
संकलित करण्यात आलेले हे नमुने मावा मिठाई, फरसाण यांचे असल्याची माहिती आह़े नोटिसा बजावण्यात आल्यानंतर अहवाल येईर्पयत संबधित विक्रेत्यांनी नमुने घेतलेल्या पदार्थाची विक्री बंद केल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात दिवाळी काळात मोठय़ा प्रमाणात मिठाईची खरेदी होणार आह़े यातून नागरिकांना सुरक्षित पदार्थ मिळावेत यासाठी खाद्यपदार्थासोबतच कच्चा मावा आणि खवा यांचीही तपासणी करण्यात येणार आह़े 
नंदुरबार येथे अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने  जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर कार्यालय सुरु करण्यात आले आह़े जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत  असलेल्या या कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त आहेत़  तपासणी मोहिम दिवाळीनंतरही सुरु राहणार असल्याचे कळवण्यात आले आह़े जिल्ह्यात प्रामुख्याने तयार करण्यात येणा:या मिठाईसाठी लागणारा मावा आणि खवा हा गुजरात आणि राजस्थानातून आयात केला जातो़ त्याची योग्य ती तपासणी करण्याची मोहिम सध्या विभागाने हाती घेतल्याचे कळवण्यात आले आह़े विभागाकडून शहादा आणि नंदुरबार येथील व्यावसायिकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ नोटिसनुसार येत्या 20 दिवसात संबधितांना सुधारणा करून म्हणणे मांडावयाचे आह़े तसेच स्वच्छता आणि अन्न पदार्थाचा दर्जा सुधारण्याचीही सूचना करण्यात आल्याची माहिती आह़े 
जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांकडे आजघडीस तब्बल 500 क्विंटलपेक्षा अधिक  खवा आणि मावा कच्चा माल म्हणून वापरात आह़े यातही येत्या चार दिवसात परराज्यातून आणखी 500 क्विंटल कच्च्या मालाची आवक होणार आह़े या मालाची योग्य ती तपासणी करण्याची गरज असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
 

Web Title: Notice of Food and Drug Administration to eight sweet marketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.