नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:40 PM2018-04-08T12:40:25+5:302018-04-08T12:40:25+5:30

विरचक धरणातील साठा होतोय कमी : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन

Now the basis of Ambehra for the people of Nandurbar | नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 8 : पालिकेला आता आंबेबारा धरणाचा आधार घ्यावा लागणार आहे. याआधीच आरक्षीत केलेले धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून ते शहरात आणण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विरचक धरणावरील पंपींग स्टेशवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, पालिकेने दुस:या बुस्टर पंपाचे काम देखील पुर्ण केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन आता सुसह्य होणार आहे.
नंदुबार शहरात पाणी टंचाईची तीव्रता नाही. दर एक दिवसाआड व पाऊण ते एक तास पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु भविष्यातील नियोजन आणि यदाकदाचीत पाऊस लांबलाच तर विरचक प्रकल्पातील पाणीसाठा पुरेसा शिल्लक असावा यासाठी आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. दरवर्षी हे पाणी एप्रिल व मे महिन्यात वापरले जाते. त्यानुसार ते पाणी वापरण्यास सुरुवात झाली आहे.
50 टक्के आरक्षीत
आंबेबारा धरणातील एकुण पाणी साठय़ापैकी 50 टक्के पाणीसाठा हा दरवर्षी पालिका आरक्षीत करीत असते. साधारणत: डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सभेत ठराव करून तो जिल्हाधिका:यांकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधित विभागाला सांगून आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने आंबेबारा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणातील पाणी साठय़ाचा फारसा प्रश्न नाही. 
या धरणातील आरक्षीत पाणी पाटचारीद्वारे आष्टे येथील शिवण नदीच्या पंपींग स्टेशनमध्ये आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठविल्यानंतर ते पंपींगच्या माध्यमातून शहराला पुरविले जाते. आष्टे ते नंदुरबार ही दहा   किलोमिटरची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच    तिची दुरूस्ती देखील करण्यात      येवून गळती कमी करण्यात आलेली आहे.
विरचकमध्ये 33 टक्के साठा
विरचक धरणात सद्या स्थितीत 33 टक्के पाणीसाठा आहे. हे संपुर्ण पाणी नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. साधारणत: ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यार्पयत हे पाणी शहरवासीयांना पर्याप्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाऊस जरी लांबला तरी हे पाणी पुरणार आहे. 
त्यासाठी मात्र आतापासूनच काटकसर करणे देखील आवश्यक आहे.
गेल्या पावसाळ्यात विरचक धरणात 65 टक्केर्पयत पाणीसाठा झाला होता. धरणाचे बांधकाम झाल्यापासून आतार्पयत एकदाही या धरणात संपुर्ण 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही. पुर्ण क्षमतेने धरण भरले तरच शेतीसाठी या ठिकाणी पाणी आरक्षीत करण्याची तरतूद असल्याचे समजते.
 

Web Title: Now the basis of Ambehra for the people of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.