आता जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा
By admin | Published: July 15, 2017 06:14 PM2017-07-15T18:14:12+5:302017-07-15T18:14:12+5:30
जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोशाळा व स्वयंचलित वेधशाळा येथे सुरू होणार आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.15 - जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोशाळा व स्वयंचलित वेधशाळा येथे सुरू होणार आहे. त्याचे ऑनलाईन उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि जलस्वराज्य-2 या उपक्रमाअंतर्गत प्रयोगशाळा व वेधशाळा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनेक नळ-पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यांचा कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला आहे. अशा योजनांच्या जलस्वराज्य-2 कार्यक्रमाअंतर्गत वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेकडील जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा व स्वयंचलित वेधशाळा कार्यान्वीत होणार आहे. या दोन्ही उपक्रमांचा ई-भुमिपूजन कार्यक्रम नुकताच झाला.