आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाचे स्वप्न-अभय गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:50 AM2020-01-27T11:50:21+5:302020-01-27T11:50:34+5:30

जिल्ह्यातील युवकांना क्रिडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठा वाव आहे. प्रशासनानेही सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. - अभय गुरव

Now the dream of participating in the international competition - Abhay Gaurav | आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाचे स्वप्न-अभय गुरव

आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाचे स्वप्न-अभय गुरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कुणीही यश मिळवू शकतो. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन खेलो इंडिया स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक मिळविलेल्या अभय गुरव याने व्यक्त केले....
उंचउडी खेळाकडे कसा वळला?
खेळाविषयी आपल्याला लहानपणापासून आवड होती. गावात खेळतांना किंवा शेतात जातांना सहज सराव म्हणून खेळत राहिलो आणि या खेळाकडे आकर्षीलो गेलो. महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी खरे मार्गदर्शन मिळाले आणि यश मिळवित गेलो.
खेळातील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन कुठून घेतले?
शालेय जीवनात खेळतांना कुणीही मार्गदर्शन केले नाही. युट्यूबच्या माध्यमातून खेळातील काही बाबी जाणून घेतल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना यशवंत विद्यालयातील क्रिडा मार्गदर्शक डॉ.मयूर ठाकरे यांनी खेळातील अनेक बारकावे शिकविले. खेळण्यासाठी सोय करून दिली. आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने खेळाच्या ट्रॅकवर आलो.
यापुढे काय नियोजन आहे?
आर्मी पोस्टमध्ये आपली निवड झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाचे स्वप्न आहे.


खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव फारच वेगळा होता. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळासाठीचे बारकावे माहित झाले आहे. आपण घेतलेली मेहनतीमुळे या स्पर्धेत आपण पदक पटकवूच ही अपेक्षा होती. परंतु थेट सुवर्णपदकावर पोहचलो.


परिश्रम हवेच...
खेळात परिश्रम, जिद्द याशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त सराव करणे आणि खेळातील बारकावे शिकणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्या आवडीच्या खेळात पारंगत होऊन योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली मेहनत व सराव केल्यास यश नक्कीच मिळेल.

 

 

Web Title: Now the dream of participating in the international competition - Abhay Gaurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.