आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:20 PM2018-03-06T12:20:14+5:302018-03-06T12:20:14+5:30

वाल्हेरी पर्यटन स्थळ : लवकरात लवकर तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी

Now let's begin our actual work | आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी

आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 6 : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी येथील पर्यटन विकास प्रस्तावासाठी शासनाने नुकताच 56 लाखांचा निधी मंजूर केला आहे. परंतु आता यामध्ये येणा:या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन प्रत्येक्ष काम सुरु करण्याची अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आह़े 
 गेल्या अडीच महिन्यापासून निधीअभावी शासनाकडे हा प्रस्ताव धूळ खात  पडलेला होता़ परंतु त्यानंतर शासनाकडून यासाठी निधीची तरतुद करण्यात आली़ त्यामुळे साहजिकच पर्यटक व निसर्ग प्रेमींमध्ये समाधानाची भावना आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी संबंधित यंत्रनेने तातडीने पुढील कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होतेय़                   
तळोदा शहरापासून 18 किमी अंतरावर वाल्हेरी हे पर्यटन स्थळ आह़े सातपुडय़ाच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसराने नटलेल्या या स्थळाने पर्यटक व निसर्गप्रेमींना  मोठय़ा प्रमाणात भुरळ घातली आह़े त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हाबाहेरील शेकडो पर्यटक नयनरम्य, आकर्षक धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो.
पर्यटन स्थळार्पयत जाण्यासाठीसुध्दा चांगला मार्ग नाही़ परंतु अशा स्थितीतदेखील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. हे पर्यटनस्थळ येथील वनविभागाच्या हद्दीत आहे. तत्कालीन जिल्हा प्रशासनाने 2015 मध्ये जिल्हा नियोजन आराखडय़ातून वाल्हेरीसाठी निधी देण्याचे कबूल केले होते. तशी मागणी ही नियोजन समितीच्या सदस्यांनी केली. त्यामुळे साहजिकच प्रशासनाने तेव्हा येथील वनविभागाकडून तातडीने प्रस्ताव मागितला होता. त्यानुसार प्रशासकीय यंत्रनेनेसुध्दा युध्द पातळीवर याबाबत कार्यवाही करीत साधारणत 40 लाखांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. परंतु त्यानंतर त्यावर कार्यवाही ऐवजी तो तसाच धूळ खात पडला होता.
जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करुन दिला नसल्याने त्यामुळे पर्यटकांच्या पदरी आशा ऐवजी निराशाच पडली होती.  त्यानंतर एप्रिल 2017 मध्ये पुन्हा आमदार उदेसिंग पाडवी यांच्या पाठपुराव्यानुसार येथील वनविभागाने 56 लाख 47 हजारांचा  प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविला होता. आमदार पाडवी यांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. आता या प्रकरणी संबंधित यंत्रनेने तातडीने तांत्रिक कार्यवाही करण्याची पर्यटकांची मागणी आहे
 

Web Title: Now let's begin our actual work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.