नंदुरबारात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:23 PM2018-05-17T12:23:23+5:302018-05-17T12:23:23+5:30
उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष : जिल्हा सामान्य रुग्णालयात दंशाचे रेकॉर्ड मिळेना
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आह़े केवळ रेल्वे स्थानकावरच गेल्या आठ दिवसात 10 जणांना श्वानदंश झाला आह़े दरम्यान, असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे श्वानदंश, सर्पदंशाचे रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आह़े
जिल्हा सामान्य रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले आह़े सर्पदंशासह श्वानदंशाचे रेकॉर्ड अद्यावत नसल्याने सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून याकडे नगरपालिका प्रशासनाकडूनही दुर्लक्ष करण्यात येत आह़े याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्याशी ‘लोकमत’तर्फे संपर्क साधण्यात आला़ यावेळी त्यांनी सांगितले की, नगरपालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े केवळ ‘डॉग व्हॅन’ असून त्या ताफ्यामध्ये पशुवैद्यकीय अधिका:याचीसुध्दा आवश्यकता असत़े परंतु नगरपालिकेकडे पशुवैद्यकीय अधिकारीसह इतरही तज्ज्ञ कर्मचा:यांची कमतरता असल्याचे गिरी यांनी सांगितल़े
शहरात ठिकठिकाणी भटकी कुत्री फिरत असून यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आह़े रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांना भटक्या कुत्र्यांचा मोठय़ा प्रमाणात त्रास जाणवत असतो़ यातून अनेक वेळा मोठे अपघतासुध्दा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़