नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:01 PM2018-04-19T13:01:38+5:302018-04-19T13:01:38+5:30

पाच वर्षाचा वाढता आलेख : धकाधकीच्या जीवनशैलीत काळजी घेणे गरजेचे

The number of mental patients in Nandurbar is alarming | नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

Next

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 19 : नंदुरबार जिल्ह्यात सध्या मानसिक आरोग्याची समस्या भेडसावू लागली आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाचा आलेख पाहिला असता मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांची संख्या वाढत जात आहेत़ मार्च 2018 र्पयतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात  3 हजार 991 मनोरुग्णांची संख्या असल्याचे समजत़े 
रोजचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येणाचा संभव असतो़ याचाच परिणाम म्हणून की काय जिल्ह्यात मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आह़े ‘लोकमत’तर्फे 2013 पासून जिल्ह्यातील मनोरुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला़ 
मनोरुग्णांची संख्या मोजण्यासाठी साधारणत 4 विभाग करण्यात येत असतात़ आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नवीन रुग्ण व आधीपासून उपचार घेत असलेले रुग्ण अशी विभागणी करण्यात येत असत़े त्यानुसार 2013 मध्ये 212 रुग्ण, 2014 मध्ये 423 रुग्ण, 2015 मध्ये 1 हजार 660 रुग्ण, 2016 मध्ये 2 हजार 637, 2017 मध्ये 2 हजार 588 तर 2018 मध्ये मार्च महिन्यार्पयत तब्बल 3 हजार 991 रुग्णांची नोंद नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आह़े दिवसेंदिवस जिल्ह्यात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाटावी अशी आकडेवारी समोर येत आह़े त्यामुळे नागरिकांनी ताण-तणावमुक्त जीवनशैली ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े मानसिक तणावामुळे अनेक वेळा रुग्ण आत्महत्यासारखे पर्याय निवडत असतो़ त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णातील मानसिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात शिबीरे घेऊन दुर्गम भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आह़े त्याचा फायदा म्हणून आंतररुग्ण विभागाच्या तुलनेत बाह्यरुग्ण विभागात मोठय़ा संख्येने रुग्णांची नोंद करण्यात येत असत़े  
अनेक नागरिकांना मानसिक आजारांची लक्षणे असूनही त्यांना याबाबत समजून येत नसत़े छिन्नमनस्कता, उदासिनता, अतिउत्साह, चिंतेचे विकार, व्यसनाधिनता, मिरगीचा आजार, स्मृतिभं्रश, झोपेचे विकार आदी मानसिक आजारांची लक्षणे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असतात़ त्यामुळे अशा स्थितीत मानसिक आजार असूनही काही वेळा रुग्ण सामान्य जीवन जगत असतो़ परंतु कालांतराने त्याच्या वागण्यात मोठय़ा प्रमाणात बदल घडून येत असतात़ व हळुहळु लक्षणांमध्ये वाढ होत असत़े 
जीवनशैलीत बदल करावे
अनेक वेळा मानसिक आजाराला कारण ठराविक जीवशैलीदेखील ठरत असत़े कुणाशी न बोलणे, एकांतात राहणे पसंत करणे, इच्छा असूनही एखादी गोष्ट करण्यास कंटाळा करणे आदी जीवनशैलीमुळे मानसिक आजार जडण्याची शक्यता असत़े त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास येऊ घातलेल्या मानसिक आजाराला दूर सारता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े आदिवासी जिल्हा असल्याने दुर्गम भागात अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण आढळून येत असतात़ त्यामुळे दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात मानसिक आरोग्य सेवेला अत्यंत महत्व निर्माण झाले आहेत़ मानसिक आरोग्य स्वस्त रहावे यासाठी शासनाकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असत़े
 

Web Title: The number of mental patients in Nandurbar is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.