देहविक्रीप्रकरणात अल्पवयीन मुलींची संख्या वाढली

By admin | Published: January 17, 2017 11:59 PM2017-01-17T23:59:06+5:302017-01-17T23:59:06+5:30

न्यायालयीन कोठडीचे आदेश : तीन महिलांवर गुन्हा दाखल

The number of minor girls increased in the milk marketing process | देहविक्रीप्रकरणात अल्पवयीन मुलींची संख्या वाढली

देहविक्रीप्रकरणात अल्पवयीन मुलींची संख्या वाढली

Next

शहादा : शहरातील नव्या भाजीपाला मार्केटलगत छुप्या पद्धतीने देहविक्री करणा:या 68 महिलांना शहादा पोलिसांनी ताब्यात घेतले होत़े यात सात युवती ह्या अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले होत़े ही संख्या वाढली असून वैद्यकीय तपासणीअंती तीन युवती अल्पवयीन असल्याचे समोर आले आह़े
या प्रकरणी तीन महिलांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता़ यातील संशयित आरोपी असलेल्या महिलांना पोलिसांनी गेल्या आठवडय़ात शहादा येथे अटक केली होती़ तर उर्वरित एका महिलेला दोन दिवसांपूर्वी गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आह़े तीन महिलांना 27 जानेवारीर्पयत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आह़े यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन युवतींना नंदुरबार बालविकास समितीच्या ताब्यात देण्यात आले होत़े तर आता पुन्हा नव्याने निष्पन्न झालेल्या तीन अल्पवयीन मुलींनाही या समितीकडे सोपवण्यात आले आह़े या सर्व युवतींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आह़े
कारवाई करण्यात आलेल्या 68 महिला व युवतींपैकी 58 महिला सध्या जयनगर येथील सुधारगृहात आहेत़ यातील 16 महिलांना बोरीवली तर 16 महिलांना कांदिवली येथे महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आह़े उर्वरित 26 महिलांना जयनगर आणि पुणे येथे सुधारगृहाकडे रवाना करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आह़े जयनगर येथे सध्या दाखल करण्यात आलेल्या महिलांची चौकशी पोलीस करत आहेत़  या प्रकरणाचा तपास शहादा पोलीस करत आहेत़ शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी लतीफ तडवी, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधंवत, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, नीलिमा सातव, ज्ञानेश्वर बडगुजर, अंकुश बोराटे यांच्यासह पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी गेल्या आठवडय़ात ही कारवाई केली होती़  (वार्ताहर)

अल्पवयीन युवतींची संख्या वाढणार
4शहाद्यात झालेल्या या कारवाईनंतर भाजीपाला मार्केटलगत गेल्या आठवडाभरापासून शुकशुकाट आह़े याठिकाणी सामसूम असल्याने परिसातील अनेक अवैध धंदे आपसूक बंद झाले आहेत़
4मुंबई येथील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेतर्फे ही कारवाई करण्यात आली होती़ या कारवाई फाउंडेशनच्या शायनी पडियार यांनी सहभाग घेत पोलीस अधिका:यांना माहिती दिली होती़ याबाबत शायनी पडियार यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी अद्याप अनेकींची वैद्यकीय तपासणी बाकी आह़े त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन युवतींची संख्या वाढणार असल्याची माहिती दिली आह़े
4देहविक्रीला प्रवृत्त करणा:या तीन महिलासोबत आणखीन कोणाचा सहभाग आहे, किंवा कसे, याचा तपास शहादा पोलीस ठाण्याच्या अधिका:यांकडून करण्यात येत आह़े
 

Web Title: The number of minor girls increased in the milk marketing process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.