विद्यार्थी क्षमतेला ‘न्युपा’अॅपची जोड

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: September 9, 2017 12:06 PM2017-09-09T12:06:27+5:302017-09-09T12:07:04+5:30

गुणांची ऑनलाईन नोंद : शासनाकडून पहिल्यांदाच होतोय प्रयोग

Nupa App Link to Student Capacity | विद्यार्थी क्षमतेला ‘न्युपा’अॅपची जोड

विद्यार्थी क्षमतेला ‘न्युपा’अॅपची जोड

googlenewsNext
ठळक मुद्देपारदर्शकतेसाठी होणार फायदा पायाभूत चाचणी परीक्षेचे मुल्यमापन योग्य व पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी तसेच विद्याथ्र्याची क्षमताचाचणी योग्य पध्दतीने टिपता यावी यासाठी अॅप प्रणाली फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े गेल्या वर्षापासून पायाभ

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : इयत्ता दुसरी ते नववीसाठीच्या पायाभूत चाचणी परीक्षेसाठी शासनाकडून न्युपा अॅप विकसीत करण्यात आले आह़े सर्व विद्याथ्र्याच्या क्षमतानिहाय नोंदणीसाठी नवी दिल्ली येथील ‘न्युपा’ याच्याकडून हे अॅप विकसीत करण्यात आले आह़े यानुसार शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीनेदेखील विद्याथ्र्याच्या गुणांची नोंद करणे शक्य होणार आह़े
याबाबत शासनाकडून अधिकृत पत्र राज्यभरातील शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले आह़े संपूर्ण राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता दुसरी ते नववीसाठी पायाभूत चाचणी घेण्यात येत आह़े यासाठी विद्याथ्र्याची गुणवत्ता तसेच त्यांचे संपादणुकीकरण कसे आहे यासाठी शाळा भेटी अभियान राबविण्यात येत असत़े शिक्षकांनी या अॅपचा वापर केल्याने त्यांना विद्याथ्र्याचे गुण आपोआप सरल प्रणालीमध्ये नोंदविता येणार आह़े 
अशा अॅप प्रणालीमध्ये गुणांची नोंद केल्यावर वरीष्ट कार्यालयाने कोणत्याही प्रकारची हार्डकॉपी शिक्षकांकडून तसेच शाळांकडून मागवण्याचीदेखील गरज राहणार नसल्याचेही समजत़े सदर अॅपची लिंक लवकरच सर्वाना उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े 
दरम्यान, शासनाच्या नवीन आदेशानुसार शिक्षकांना किंवा केंद्रप्रमुखांना मूल्यमापन करतांना येणा:या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक चाचणीच्या वेळेस, प्रत्येक दिवशी उपसंचालक, प्राचार्य, वरिष्ट अधिव्याख्याता, विषय सहाय्यक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदी अधिका:यांना चाचणीच्या वेळेस प्रत्येक दिवशी एका शाळेवर उपस्थित रहावे लागणार आह़े  तसेच चाचणीनंतरसुध्दा शाळा भेटी करुन मूलभूत व वर्ग पातळीवरील क्षमतांबाबत विद्यार्थी संपादणूकीची पडताळणी करावयाची आह़े 
कामाचा अहवालही तातडीने शासनाच्या संकेतस्थळावर
संबंधित अधिका:यांनी शाळेची पूर्ण चाचणी स्वता शिक्षकांच्या मदतीने करुन घेण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आह़े त्याच प्रमाणे केलेल्या कामांचा आढावा शाळा भेटीचा तपशीलदेखील त्याच दिवशी शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आह़े शासनाकडून शाळाभेटीची माहिती मागविण्यासाठी एक लिंक देण्यात आली आह़े या लिंकवर संबंधित अधिका:यांनी कामाचा आढावा द्यायचा आह़े 
दरम्यान, संबंधित अधिका:यांनी भेटी दिलेल्या शाळांमधील काही शाळा लॉटरी पध्दतीने निवडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव हे त्या शाळांमध्ये राज्यस्तरीय अधिका:यांना पाठवून शाळा भेटीचे मुल्यमापन व्यवस्थित झाले आहे की नाही याची पडताळणी करणार असल्याची माहिती मिळाली़ 
 

Web Title: Nupa App Link to Student Capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.