धनराट बीटअंतर्गत राष्ट्रीय पोषण माहअंतर्गत पोषण बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:54+5:302021-09-26T04:32:54+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून ललिता वसावे, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक हाशमी, पर्यवेक्षिका शांताबाई कोकणी, सीमा मुळतकर, ...
प्रमुख पाहुणे म्हणून ललिता वसावे, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक हाशमी, पर्यवेक्षिका शांताबाई कोकणी, सीमा मुळतकर, पिरामल फाऊंडेशनचे स्टीफन मस्कनळी, तालुका समन्वयक संदीप सूर्यवंशी, अंजली वसावे, व धनराट बीटच्या पर्यवेक्षिका वैशाली पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन व मार्गदर्शनानंतर सर्व किशोरवयीन मुले-मुली यांच्यासाठी ‘पोषण बाजार’ खुला करण्यात आला. प्रत्येक स्टॉलला जाऊन सर्व किशोरवयीन मुले-मुली व गरोदर-स्तनदा मातांनी माहिती जाणून घेतली. या सुंदर उपक्रमांचे कौतुक करीत अंजली वसावे यांनी प्रत्येक स्टॉलला दोनशे रुपये बक्षीस म्हणून दिलेत. परसबाग, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, गरोदर व स्तनदा मातांचा आहार, बी.एम.आय., रक्तक्षय, पूर्व शालेय शिक्षण, सात अन्नगट, वृद्धी सनियंत्रण, लसीकरण विविध पौष्टिक पाककृती असे आहार प्रदर्शनाचे दहा स्टॉल यात समाविष्ट करण्यात आलेले होते. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंडार यांनी बालकांचा आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. बीट पर्यवेक्षिका वैशाली पाटील यांनी उपस्थित माता व किशोरवयीन मुलं-मुली यांना हिमोग्लोबीन वाढ व वजन वाढ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कुपोषणाचे प्रमुख कारण म्हणजे बालविवाह असून, बालविवाह रोखण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
मार्था खेंगार यांनी प्रास्ताविक केले. अंगणसेविका उषा गावित यांनीदेखील सात अन्नगटाविषयी माहिती दिली. पोषण विषयक प्रतिज्ञा घेण्यात आली. आश्रमशाळेचे शिक्षक सुनील गावित यांनी सूत्रसंचालन केले, तर लता गावित यांनी आभार मानले.
यशस्वितेसाठी येथील अंगणवाडी सेविका ललिता वसावे, भारती वसावे, रंजना वसावे, प्रियतमा वसावे, कुसुमताई वसावे, उषा गावित, गेजमा गावित, रंजिता गावित यांसह बीट अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राणिकुंड येथील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.