ओबीसी मंत्रालयामुळे प्रश्न सुटण्यास मदत होणार - राजकुमार बडोले
By admin | Published: January 11, 2017 11:39 PM2017-01-11T23:39:04+5:302017-01-11T23:39:04+5:30
सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केला.
नंदुरबार : राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठीच सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत विजय चौधरी यांच्या रुपाने राज्यातील ओबीसींसाठी चांगले नेतृत्व मिळाल्याचे प्रतिपादन समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात विजय चौधरी यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विजयपथ या गौरविकेचे प्रकाशन मंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ.हीना गावीत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.संजय कुटे, हिरालाल मगनलाल चौधरी, माजी नगराध्यक्षा इंदुताई चौधरी, धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष बबन चौधरी, आमदार शिरीष चौधरी, धुळ्याच्या माजी महापौर जयo्री अहिरराव, डॉ. रवींद्र चौधरी, अरविंद कुवर, प्रकाश माळी, मनीषा चौधरी, नगरसेविका अनिता चौधरी, वैशाली विजय चौधरी उपस्थित होते.
यावेळी बडोले यांनी सांगितले, अनेक वर्षा पासून ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र मंत्रालयाची मागणी होती. त्यानुसार तत्कालीन शासनाने 1999 मध्ये यावर विचार केला परंतु तो निर्णय मागे राहिला. भाजप शासनाने यावर विचार करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातील 350 जातींना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
ओबीसी समाजाला चांगले व्यक्तिमत्व लाभले आहे. ते समाजाला उन्नतीकडे नेण्याचा प्रय} करत असल्याचे गौरवोद्गारही बडोले यांनी काढले.
खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले, शहरात प्रस्थापित राजकारणी लोकांसमोर कोणी उभे रहात नव्हते, परंतु आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या संघर्षमयी जीवनात नेहमी विजय चौधरी उभे राहिले आहेत. भविष्यात देशात ओबीसी नेतृत्वाच्या रूपाने राष्ट्रीय अध्यक्ष बनावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार संजय कुटे यांनीही विजय चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला.
आमदार शिरीष चौधरी, पुरूषोत्तम काळे, o्रावण चव्हाण, नाना महाले, प्रशांत पाटील, वैष्णवी चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.
विजय चौधरी यांनी सांगितले, कार्यकर्ते हेच माङो बळ आहे. रणझुंझार समितीच्या माध्यमातून काम केले, लोकांचे प्रश्न सोडविले, प्रस्थापितांविरुद्ध लढलो. प्रामाणिक हेतू, त्याला तडीस नेण्याची धमक असेल तर कोणी पराभूत करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ओबीसींना क्रिमिलेअरची अट शिथिल करावी अथवा आठ लाख रुपयाची अट करावी, अशी मागणी विजय चौधरी यांनी केली.
प्रस्ताविक रूपेश यांनी केले. सूत्रसंचालन पाटकर आणि विष्णु जोंधळे यांनी केले.
ओबीसी मोर्चा पदाधिका:यांचा राज्यस्तरीय मेळावा
सकाळी राज्यभरातील ओबीसी मोर्चाच्या पदाधिका:यांचा मेळावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करताना राजकुमार बडोले व आमदार संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील पदाधिका:यांना अधीक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आणखी एक राज्यस्तरीय दौरा आयोजित करण्यात येणार असून पदाधिका:यांनी आपापल्या जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी अधीक क्रियाशिल करण्याचे आवाहन त्यांनी केले.