आचारसंहितेचे व शस्त्रबंदी आदेशाचे पालन करा - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:43+5:302021-09-21T04:33:43+5:30

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नमुना १ मध्ये तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गावचावडी तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या विभाग/ ...

Obey the Code of Conduct and Disarmament Order - Collector | आचारसंहितेचे व शस्त्रबंदी आदेशाचे पालन करा - जिल्हाधिकारी

आचारसंहितेचे व शस्त्रबंदी आदेशाचे पालन करा - जिल्हाधिकारी

Next

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नमुना १ मध्ये तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गावचावडी तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या विभाग/ निर्वाचक गणातील प्रत्येक गावात सूचनाफलकावर तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण

मतदारसंघाच्या क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांकडील (राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे सुरक्षा कर्मचारी, पोलीस कर्मचारी वगळता) शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

विशिष्ट परवानाधारकांच्या बाबतीत त्यांची गरज तपासून ठराविक कालमर्यादेसाठी परवानाधारकांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितल्यास त्यांच्या अर्जावर तपासून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एका आठवड्यानंतर परत करण्यात येतील. विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस विभागाने कारवाई करावी, असेही

जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Obey the Code of Conduct and Disarmament Order - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.