दीड हजार मालमत्ताधारकांच्या हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:55 PM2018-12-26T12:55:13+5:302018-12-26T12:55:19+5:30

तळोदा पालिका : वाढीव घरपट्टी विरोधात आलेल्या हरकतींवर उद्या सुनावणी

Objection of one and a half thousand | दीड हजार मालमत्ताधारकांच्या हरकती

दीड हजार मालमत्ताधारकांच्या हरकती

Next

तळोदा : वाढीव घरपट्टी विरोधात येथील पालिकेत साधारण एक हजार 500 मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या आहेत. यात सर्वाधिक प्रमाण नवीन वसाहतीतील रहिवाशांचे आहे. दरम्यान या हरकतींवर समितीकडून 27 व 28 रोजी सुनावणी होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 
तळोदा नगरपालिकेत साधारण सहा हजार 200 मालमत्ताधारक आहेत. यात नवीन एक हजार 200 मालमत्ताधारकांची वाढ झालेली आहे. साधारण 200 अतिक्रमण धारकदेखील आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पालिकेने आपल्या हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची मूल्यांकन केल्यानंतर साहजिकच त्यांना घरपट्टी भरण्याबाबत नोटीसी बजाविल्या आहेत. पालिकेने यंदा घरपट्टी आकारतांना सरसकट 24 टक्के अतिरिक्त कर वाढविला आहे. या वाढीव घरपट्टीच्या नोटीसा नागरिकांच्या हातात पडण्याबरोबर रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. पालिकेने पाच वर्षानंतर घरपट्टी वाढविल्याचा दावा केला असला तरी यंदाच्या अतिशय कमी पजर्न्यमानामुळे उत्पादनात प्रचंड तुट येवून समाजातील सर्वच घटकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पालिकेने यंदा घरपट्टीत थोडीशी सवलत देण्याची रहिवाशांची अपेक्षा होती. परंतु याउलट तब्बल 24 टक्के अतिरिक्त कर आकारून एक प्रकारे आर्थिक भरुदड लादल्याचा मालमत्ताधारकांचा आरोप आहे. पालिकेच्या या अवाजवी कर निर्धारण विरोधात नागरिकांमधून मोठय़ा प्रमाणात हरकती घेतल्या जात आहेत. सोमवार्पयत साधारण एक हजार 500 जणांनी पालिकेकडे हरकती दाखल केल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले होते. अजूनही हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबर 2018 र्पयत असल्याने त्या वाढण्याची शक्यता आहे. हरकती दाखल करणा:यांमध्ये सर्वात जास्त संख्याही नवीन वसाहतीतील रहिवाशांची आहे. कारण या वसाहत धारकांना पहिल्यांदाच पालिकेच्या हद्दीत आल्यानंतर प्रचंड घरपट्टी आकारण्यात आल्याने साहजिकच त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातही घरपट्टी आकारतांना दुजाभाव केल्याचा त्यांचा आरोप आहे. टोले गंज इमारतीस कमी तर साधारण घरास अधिक असा प्रकार झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच तक्रार करणा:यांमध्ये अधिक संख्या नवीन वसाहतधारकांची असल्याचे म्हटले जाते. दरम्यान वाढीव घरपट्टीबाबत नगरपालिकेकडून येत्या 27 व 28 डिसेंबर 2018 या दोन दिवस सुनावणी घेण्यात येणार आहे. 
या हरकतींवर नियुक्त करण्यात आलेली नगर विकास विभागाची समिती प्रत्यक्ष अजर्दारांशी चर्चा करणार आहे. मालमत्ताधारकांचे प्रत्यक्ष जागेवर जावून मालमत्तेचे मोजमाप केल्याचा दावा पालिकेने केला असला तरी या समितीने देखील प्रत्यक्ष जागेवर येवून पडताळणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
 

Web Title: Objection of one and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.