अखेर उद्घाटनाविना सुरू झाले कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:44 AM2017-08-13T11:44:31+5:302017-08-13T11:44:31+5:30

तहसीलची नवी इमारत : सेतू केंद्र व स्टॅम्प वेंडरांचे कामकाजही उद्यापासून सुरू

The office was initially started without an inauguration | अखेर उद्घाटनाविना सुरू झाले कार्यालय

अखेर उद्घाटनाविना सुरू झाले कार्यालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तहसील कार्यालयाचे अखेर स्थलांतर करण्यात आले असून पुर्ण कामकाज त्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. स्टॅम्प वेंडर तसेच सेतू केंद्र देखील 15 ऑगस्टपासून नवीन कार्यालयात सुरू होणार आहे. दरम्यान, तहसील कार्यालय स्थलांतराची माहिती ग्रामिण भागात नसल्यामुळे अनेकजण जुन्या कार्यालयात जावून त्यांना परत फिरावे लागत आहेत.        
नंदुरबार तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीचे भिजत घोंगडे गेल्या अनेक दिवसांपासून होते. सहा महिन्यांपूर्वी एकदाचे इमारत बांधकाम पुर्ण झाले. मात्र, उद्घाटन होत नसल्यामुळे कार्यालय देखील स्थलांतरीत होत नव्हते. उद्घाटनाच्या तारखा निश्चित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बांधलेली चांगली इमारत खराब होण्याचा धोका होता. याआधी या इमारतीत दोन वेळा ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी करण्यात आलेली होती. शिवाय इतर कामांसाठी देखील या इमारतीचा वापर होऊ लागला होता. त्यामुळे मुळ उद्देश बाजूलाच राहून राखीव कामांसाठी या इमारतीचा वापर होऊ लागल्याने नव्या इमारतीची दुरवस्था होण्याचा धोका होता. ही बाब लक्षात घेता उद्घाटनाशिवाय या इमारतीत कामकाज सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आणि त्यानुसार कामकाज सुरू देखील झाले आहे. 
अनेकांना माहितीच नाही
तहसील कार्यालयात शहरीसह ग्रामिण भागातील जवळपास सर्वच नागरिकांचे काम असते. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कामासाठी प्रत्येकाला या ठिकाणी यावेच लागते. ही बाब लक्षात घेता कार्यालयाचे स्थलांतर झाल्याची माहिती सर्वसामान्यांर्पयत पोहचविणे आवश्यक होते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेकजण जुन्या कार्यालयात जात आहेत, परंतु तेथे कार्यायल बंद असल्यामुळे त्यांना   परत जावे लागते. तेथून रिक्षा करून पुन्हा दोन किलोमिटर अंतरावरील नवीन कार्यालयात जावे लागत आहेत. जे नागरिक ग्रामिण भागातून येतात त्यांना बसस्थानकात उतरून परत त्यांना रिक्षाने नवीन कार्यालयात   जावे लागत आहे. त्यात नागरिकांना भाडे व वेळही खर्च करावा लागत आहे.
वर्दळ व व्यावसायही वाढले
तहसील कार्यालयाचे संपुर्णपणे एकाच वेळी स्थलांतर करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना सहसा त्रास होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. परंतु आता संपुर्ण कार्यालय आणि सर्वच विभाग नवीन कार्यालयात सुरू झाले आहेत. त्यामुळे या भागात वर्दळ वाढून गजबजले आहे. परिणामी लहान मोठय़ा व्यावसायिकांनाही त्याचा लाभ मिळू लागला आहे. अनेकांनी रस्त्याच्या बाजुला  ङोरॉक्सचे दुकान सुरू केले आहे. काहींनी स्टॅम्प विक्री देखील सुरू केली आहे. चहा, शितपेय विक्रीची दुकाने देखील या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत.
सेतू केंद्रही सुरू होणार
नवीन इमारतीत लवकरच सेतू केंद्राचेही कामकाज सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या जुन्या इमारतीतच सेतू केंद्राचे कामकाज सुरू आहे.
याशिवाय स्टॅम्प वेंडरांसाठी देखील वेगळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या इमारतीत अतिशय दाटीवाटीने स्टॅम्प वेंडर यांना बसावे लागत होते. आता नवीन इमारतीत मोठे शेड तयार करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी कामे घेवून येणा:या नागरिकांसाठी देखील सोय करण्यात आलेली आहे.
अभ्यागतांसाठी हॉल
तहसील कार्यालयात कामे घेवून येणा:या नागरिकांना उन्हाळा, पावसाळ्यात सोय व्हावी यासाठी अभ्यागत कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. एकाच वेळी 30 ते 40 जण बसू शकतील एवढा मोठा कक्ष असून त्यात सिमेंट व साधे बाक देखील ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पिण्याचे पाण्याची आणि स्वच्छतागृहांची देखीेल सोय   करण्यात आलेली आहे. लवकरच कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत हिरवळ तयार करण्यात येणार आहे.

Web Title: The office was initially started without an inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.