अधिका:यांकडून पावसाळी उपाययोजनांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:13 PM2019-07-10T12:13:52+5:302019-07-10T12:13:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवाराणार्थ पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना संदर्भातील बैठकीचे आयोजन कराण्यात आले होत़े यावेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवाराणार्थ पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना संदर्भातील बैठकीचे आयोजन कराण्यात आले होत़े यावेळी उपस्थित अधिका:यांनी उपाययोजनांवर चर्चा केली़
यावेळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, वर्षा अहिरे, रविंद्र मोरे, पी.टी.बडगुजर, एस.सी.ठवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही.व्ही.बोरसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होत़े
बैठकीत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहून जीवित व वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपस्थितांना केल्या़ ते पुढे म्हणाले, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी महावितरणच्या अधिका:यांनी दक्षता घ्यावी, अक्कलकुवा शहरातील वरखेडी नदीपुलाजवळील अतिक्रमण काढून पुलावर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात अन्यथा दुर्घटना झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
बैठकीत लघुपाटबंधारे विभागाचे 186 पाझर तलाव व 219 गावतलाव असून त्यांची पाहणी केल्याची माहिती पाहणी करुन सुरक्षा उपाय केल्याची माहिती कार्यकारी अभियंता रविंद्र मोरे यांनी दिली़ ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते व पुलावर कुठेही समस्या नसल्याचे उपअभियंता आर.व्ही. जामनेकर यांनी सांगितले. नवापुर शहरातील ब्रिटीशकालीन पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेकडे हस्तांतरीत केल्याने पुलावरुन अवजड वाहनांना बंदी करण्यात आल्याचे तसेच दोन्ही बाजूस बॅरिकेटस लावल्याची माहिती नवापुर पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे शिंदे यांनी दिली़
बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात येऊन पावसात वीज वाहिनी नादुरुस्त झाल्यास महावितरणने 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करावा, लघुपाटबंधारे विभागाच्या प्रत्येक प्रकल्पावर भेटी देवून अधिका:यांनी धोकादायक बाबी निदर्शनास आल्यास तातडीने दुरस्ती करावी, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत होणा:या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची पाहणी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या़ सर्व विभागांनी यंत्रणा तयार ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली़