अधिका:यांवर हल्ला करणा:यांविरोधात गुन्हा, पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:45 PM2018-08-29T12:45:08+5:302018-08-29T12:45:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यासह सात अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़
सलसाडी येथे सोमवारी सचिन मोरे या सहावीतील विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्यानंतर भेट देऊन पाहणी करत असताना 10 ते 15 जणांच्या जमावाने प्रकल्प अधिकारी विनय गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, अक्कलकुवा विभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रकाश मेढे, सहायक पोलीस निरीक्षक यादव भदाणे, आश्रमशाळेचे अधिक्षक भूषण रविंद्र सैंदाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दारासिंग गावीत, पोलीस कॉन्स्टेबल देविदास विसपुते यांच्यावर थेट हल्ला करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती़ या मारहाणीत प्रकल्प अधिकारी गौडा व तहसीलदार चंद्रे यांनी दुखापत झाली तर उर्वरित अधिकारी कर्मचारी यांना मुका मार लागला होता़
घटनेनंतर रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 15 जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सर्व संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ तपास पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आह़े
घटनेनंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपअधिक्षक प्रकाश मेढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली होती़ दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार जमावाने शासकीय कामात अडथळा आणून जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आह़े
मयत विद्यार्थी सचिन मोरे याच्यावर मंगळवारी दुपारी गढीकोठडा ता़ तळोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आल़े यावेळी त्याच्या कुटूंबियांनी आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली़ सोमवारी त्यांनी प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन मदतीची मागणी केली होती़ घटनेनंतर सलसाडी आश्रमशाळेबाहेर पोलीस बंदोबस्त कायम असून आश्रमशाळेत तुरळक विद्याथ्र्याची उपस्थिती होती़