‘दिशा’च्या बैठकीत अधिका:यांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:09 AM2017-08-24T11:09:25+5:302017-08-24T11:09:25+5:30
समन्वय व सनियंत्रण समिती : जिल्ह्यातील विविध विकासकांमाना ‘ब्रेक’ लागल्याने नाराजी
ठळक मुद्देजिल्ह्याला विद्युतीकरणासाठी निधी मिळणार नाही़
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या सभेत वेळोवेळी सूचना करूनही कामे पूर्ण न करणा:या अधिका:यांची झाडाझडती लोकप्रतिनिधींनी घेतली़ या सभेत रखडलेल्या विकास कामांची यादी समिती सदस्यांनी सादर करून नाराजी व्यक्त केली़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़मोहन, विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक ज़ेबी़पठारे, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ़ कांतीलाल टाटिया, अक्कलकुवा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रपालसिंह राणा, सविता जयस्वाल यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, विज वितरण कंपनी, वनविभाग, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होत़े प्रारंभी जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक संजय पाटील यांचे स्वागत करण्यात येऊन मावळते पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांना निरोप देण्यात आला़ यानंतर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण, दिनदयाल उपाध्याय विद्युतीकरण योजना, आदिवासी विकास विभागाच्या योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जीवनोन्नती अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला़ बैठकीत समिती सदस्यांनी निश्चित झाल्याप्रमाणे विकासकामे होत नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली़