बरसो पुराना ये याराना, एक पलमे क्यु टूटा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:28 PM2019-07-04T12:28:08+5:302019-07-04T12:28:35+5:30
रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुश्मन ना करे दोस्त ने वो काम कर दिया, के दोस्तीके नाम ...
रमाकांत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुश्मन ना करे दोस्त ने वो काम कर दिया, के दोस्तीके नाम को बदनाम कर दिया.. बरसो पुराना ये याराणा एक पलमे क्यु टूटा.. यार मेरे तू एैसे रूठा जैसे मेरा रब रूठा..’ किशोर कुमार यांच्या हेराफेरी या चित्रपटातील या गिताचे बोल सध्या आठवतात ते नवापूरच्या सध्याच्या राजकारणाचे चित्र पाहून. या जिल्ह्याच्या राजकारणात गेली पाच दशके राज करणा:या सुरूपसिंग नाईक व माणिकराव गावीत यांच्या मैत्रित सध्या दरार आल्याने जिल्ह्यातील राजकारणातही खळबळ उडाली असून, या दोन्ही दिलदार नेत्यांच्या मैत्रित अचानक काय घडले? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.
नंदुरबार जिल्हा निर्मितीपूर्वी धुळे जिल्हा एकत्रित असतांना या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणातील अनभिषीत्त सम्राट म्हणून ज्येष्ठ नेते आमदार सुरूपसिंग नाईक व माजी खासदार माणिकराव गावीत यांची ओळख होती. दोन्ही नेत्यांनी गावाचा सरपंच पदापासून राजकारणाला सुरूवात केली आणि मागे वळून त्यांनी कधी पाहिले नाही. 1962 च्या सुमारास सुरूपसिंग नाईक व पुढे दोन ते तीन वर्षानंतर माणिकराव गावीत हे राजकारणात आले. दोघांची सुरूवात ग्रामपंचायतीपासून माणिकराव गावीत पुढे जिल्हा परिषद सदस्य, सभापती झाले. तर त्याच काळात सुरूपसिंग नाईक हे आमदार झाले. 1977 मध्ये ते खासदार झाले तर माणिकराव गावीत आमदार झाले. पण वर्षभरातच स्व.इंदिरा गांधींनी सुरूपसिंग नाईक यांना महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात मंत्री केल्याने माणिकराव गावीत खासदार झाले आणि सुरूपसिंग नाईक राज्याच्या राजकारणात आले. तेव्हापासून मध्यंतरीचा एक निवडणुकीचा अपवाद वगळता सुरूपसिंग नाईक सातत्याने आमदार म्हणून विजयी झाले व काँग्रेसच्या सत्तेत सातत्याने मंत्री म्हणून राहिले. तर माणिकराव गावीत यांनी सलग नऊ वेळा खासदार म्हणून विजयी होण्याचा विक्रम केला. या दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची एक सूत्रता, निष्ठा व मैत्रिचे आगळे भाव लोकांनी पाहिले. माणिकराव गावीत वयाने मोठे असले तरी त्यांनी सुरूपसिंग नाईक यांनाच नेता मानले. या दोन्ही नेत्यांमधील सूर चांगला जुळला होता. कधीही एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे अद्यापही वक्तव्य केलेले नाही. त्यांची पक्षाप्रती निष्ठाही दिल्ली र्पयत चर्चेत होती. दोघांचे गांधी घराण्याशी संबंध चांगले आहेत. राजकारणात या दोन्ही नेत्यांवर विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले असले तरी समाजात एक संस्कारक्षम नेते म्हणून त्यांची ओळख कायम राहिली आहे.
सध्या या दोन्ही नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रीय होत आहे. माणिकराव गावीत यांचे पूत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात आहेत तर सुरूपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष नाईक हे सहकार क्षेत्रात साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही आहेत.
सध्याच्या राजकीय प्रवाहात राजकारणात चलबिचल सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे भरत गावीत हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. परंतु उमेदवारी आमदार के.सी. पाडवी यांना मिळाली. तेव्हापासून भरत गावीत नाराज होते. ही नाराजी पुढे वाढत गेली आणि अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस पक्षातर्फे सध्या वयोमान झाल्याने सुरूपसिंग नाईक ऐवजी शिरीष नाईक यांचे नाव नवापूर मतदार संघातून पुढे येत आहे. भरत गावीत यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपचे उमेदवार तेच राहतील यात शंका नाही. त्यामुळे आगामी विधान सभा निवडणूक ही सुरूपसिंग नाईक विरूद्ध माणिकराव गावीत या दोन नेत्यांच्या घराण्यातच रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणा:या कार्यकत्र्याची मात्र चांगलीच गोची झाली आहे. नवापूर तालुक्यात तर याबाबत बहुतांश कार्यकर्ते सुन्न झाले आहेत.
एकूणच पाच दशकांच्या मैत्रित अचानक दरार कसा आला याची चर्चा सध्या कार्यकत्र्यामध्ये सुरू आहे. गेल्या 10 ते 12 वर्षापासून काही किरकोळ कारणांवरून या दोन्ही नेत्यांच्या कट्टर समर्थक कार्यकत्र्यामध्ये धुसफूस सुरू असायची. परंतु दोन्ही नेत्यांनी कधीच त्याची गंभीर दखल न घेतल्याने त्यांच्यातील मैत्री अबाधित राहिली. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांमधील संवाद कमी झाला. त्यातच भरत गावीत यांना उमेदवारी मिळाली नाही. याच गैरसमजातून नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.
आगामी राजकारण कसे राहील, कोणते वळण घेईल हा भाग येणारा काळ ठरविणार असला तरी माणिकराव गावीत आणि सुरूपसिंग नाईक या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणा:या कार्यकत्र्यामध्ये मात्र कमालीची अस्वस्थता आहे. बहुतांश कार्यकत्र्याना प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होतांना कोणाची बाजू घ्यावी, असाही प्रश्न पडणार आहे. त्यामुळे कार्यकत्र्याच्या या कोंडीवर काँग्रेसचे नेते पुढे काय मार्ग काढतात, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद घडविण्याचा प्रय} होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.