तळोदा शहरातील मोकाट जनावरांच्या हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: January 23, 2024 06:06 PM2024-01-23T18:06:55+5:302024-01-23T18:08:16+5:30
नंदुरबार : तळोदा शहरातील गणपती गल्ली परिसरात मोकाट जनावराने केलेल्या हल्ल्यात 66 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ...
नंदुरबार : तळोदा शहरातील गणपती गल्ली परिसरात मोकाट जनावराने केलेल्या हल्ल्यात 66 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.हा चित्तथरारक हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद् झाला असून नागरिकांनी मोकाट जनावरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,तळोदा शहारातील गणपती गल्लीत एका घराच्या सामोरं दोन मोकाट जनावरे गाय व बैल हे उभे होते.त्याचवेळी रस्त्यावरून दुपारच्या सुमारास दिगंबर सोनार हे कार्यक्रमात करत होते त्यावेळी घरासमोर उभे असलेल्या दोन जनावरांपैकी एका बैलाने त्यांना शिंगांच्या सहाय्याने उचलून अक्षरशः खाली पडले. क्षणभर जवळपास उभ्या असणाऱ्या लोकांना काय झाले काहीच करायला मार्ग नाही मात्र, सोनार यांच्या डोक्यातून रक्त बाहेर यायला लागल्यावर घडलेला प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यावर ते मदतीसाठी पुढे आले व त्यांनी दिगंबर सोनार यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले या हल्ल्यात दिगंबर सोनार यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समजते.
खानदेशी गल्लीमध्ये देखील अशा मोकाट जनावरांनी काही दोन-तीन तरुण व लहान मुलांवर देखील हल्ले केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
दरम्यान,बैलाने वृद्धावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पालिका प्रशासनाने याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या झुंडीमुळे अनेक वाहनचालक देखील यापूर्वी जायबंदी झाल्याच्या अनुभव आहे. मोकाट फिरणाऱ्या या प्राण्यांच्या उपद्रवाच्या सामना सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास देखील वाहन चालकांना मोकाट फिरणाऱ्या जनावरांपासून धोका निर्माण झालेला असतो. यावर कोणतीच ठोस उपाययोजना पालिका प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.