गुजरातकडे जाणारी व येणारी वाहतूक वळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:32 PM2019-08-11T12:32:39+5:302019-08-11T12:32:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाकीपाडा आणि रंगावली ता.नवापूर दरम्यान रंगावली नदीवर असलेला पूल ...

The oncoming and incoming traffic to Gujarat is diverted | गुजरातकडे जाणारी व येणारी वाहतूक वळविली

गुजरातकडे जाणारी व येणारी वाहतूक वळविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाकीपाडा आणि रंगावली ता.नवापूर दरम्यान रंगावली नदीवर असलेला पूल अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
नंदुरबार ते नवापूर शहराकडे येणा:या अवजड वाहनांचा अडथळा होऊ नये व कोणत्याही प्रकारे अपघात होऊन जिवीतहानी होऊ नये यासाठी पुढील आदेशापयर्ंत वाहतूक उच्छलमार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी नवापूरकडून जाणारी व येणारी वाहतूक नवापूर-उच्छल-कुकरमुंडा ते स्टेट हायवे क्रमांक चार-तळोदा-शहादा-दोंडाईचा-सोनगीर किंवा शिरपूरमार्गे स्टेट हायवे तीन वरून धुळ्याकडे जाईल. धुळ्याकडून येणारी व जाणारी वाहतूक धुळे- स्टेट हायवे क्रमांक तीन- सोनगीर-दोंडाईचा-शहादा-तळोदा-स्टेट हायवे क्रमांक चार ते कुकरमुंडा- उच्छलमार्गे नवापूर याप्रमाणे करण्यात आली आहे. लहान व प्रवासी वाहनांसाठी धुळेकडून येणारी व जाणारी वाहतूक ही धुळे-साक्री-पिंपळनेर ते चरणमाळमार्गे नवापूर व नवापूरकडून येणारी व जाणारी वाहतूक नवापूर-चरणमाळ-ते पिंपळनेर-साक्रीमार्गे नवापूर याप्रमाणे करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शनिवारी काढले आहेत. पूल दुरूस्त होईर्पयत ही वाहतूक कायम राहणार आहे.     
 

Web Title: The oncoming and incoming traffic to Gujarat is diverted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.