नवापुर येथे वनविभागाकडून दीड लाखाचे लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:24 PM2019-10-30T12:24:54+5:302019-10-30T12:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : महामार्गावरील एका फर्निचर मार्टवर वनविभागाने केलेल्या कारवाईत दिड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : महामार्गावरील एका फर्निचर मार्टवर वनविभागाने केलेल्या कारवाईत दिड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नवापूर पालिका हद्दीतील भारत फर्निचर मध्ये मंगळवारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी झडती घेतली. यादरम्यान तेथील घरात मोठय़ा प्रमाणात अवैध साग चौपाट व साग साईज आढळून आले. सुमारे दीड लाख रुपये किमतीचा सागवान लाकुड साठा व दोन रुंधा मशिन वनविभागाने जप्त करुन संशयित असद अब्बास कुरेशी रा. नवापुर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला़ उपवनसंरक्षक वनविभाग शहादा व सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रकाश मावची, डी़क़े जाधव, अशोक चव्हाण आदींनी ही कारवाई केली़