एलसीबीच्या पथकाकडून एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:17 PM2019-07-09T12:17:38+5:302019-07-09T12:17:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून पासा कायद्यांतर्गत स्थानबद्ध केलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने नवापुर चौफुली परिसरातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून पासा कायद्यांतर्गत स्थानबद्ध केलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने नवापुर चौफुली परिसरातून अटक केली़ सोमवारी दुपारी 1 वाजता ही कारवाई करण्यात आली़
तापी जिल्ह्यातील वेलदा येथील वसीमखान करीमखान पठाण याच्यावर तापी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होत़े यामुळे त्याला प्रिव्हेंन्शन ऑफ अँटी सोशल अॅक्टीव्हिटी अर्थात पासा या कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होत़े परंतू आदेश काढल्यापासून तो फरार होता़ दरम्यान वसीमखान हा नंदुरबार शहर मार्गाने मध्यप्रदेशात पळून जाणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यांनी नवापुर चौफुली परिसरात पथकासह सापळा रचून वसीमखान पठाण याला ताब्यात घेतल़े त्याला गुजरात पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल़े त्याच्यावर 2016 मध्ये उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत जबरी लुटीचा गुन्हा दाखल आह़े ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, जगदीश पवार, संदीप लांडगे आदींनी केली़