करडे येथे किरकोळ वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:48 PM2021-01-14T12:48:35+5:302021-01-14T12:48:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील करडे येथे मोटारसायकल रस्त्याच्या बाजूने घेण्यास सांगितल्याच्या रागातून चाैघांनी एकास मारहाण केल्याची ...

One beaten in a minor dispute at Karde | करडे येथे किरकोळ वादातून एकास मारहाण

करडे येथे किरकोळ वादातून एकास मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील करडे येथे मोटारसायकल रस्त्याच्या बाजूने घेण्यास सांगितल्याच्या रागातून चाैघांनी एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. 
सुनील सुकलाल रहासे, रा. करडे हे सोमवारी सायंकाळी बैलगाडीने शेतातून घरी येते होते. त्यांच्या घरासमोर सुरेश करमसिंग रहासे याची दुचाकी रस्त्यावर उभी होती. यावेळी सुनील रहासे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या संतोष रहासे यास मोटारसायकल बाजूला करण्यास सांगितले. याचा राग आल्याने सुरेश रहासे याने दिनेश करमसिंग रहासे, राज सुरेश रहासे व शाहीर सुरेश रहासे यांना बोलावून आणत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. दरम्यान, राज रहासे याने सुनील रहासे यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून गंभीर जखमी केले, तर इतरांनी कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी सुनील रहासे यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार पूर्ण करण्यात आले. त्यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश, दिनेश, राज व शाहीर रहासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One beaten in a minor dispute at Karde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.