विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:04 PM2020-01-08T17:04:13+5:302020-01-08T17:04:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारतर्फे मल्हारी मार्तंड नवरात्र ...

One-day parenting of students | विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे पालकत्व

विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे पालकत्व

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारतर्फे मल्हारी मार्तंड नवरात्र उद्यापनानिमित्त जिल्हातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे पालकत्व स्वीकारण्यात आले. या उपक्रमात चार हजार ७७५ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यात आले.
या उपक्रमात आश्रमशाळा स्वच्छ करून परिसर स्वच्छ करण्यात आला. विद्यार्थी राहतात, झोपतात, ज्याठिकाणी जेवण करतात अशा सर्व खोल्या स्वच्छ करण्यात आल्या. विद्यार्थ्यांची आंघोळ करून त्यांची शारीरिक स्वच्छता करण्यात येऊन त्यांचे कपडे स्वच्छ धुण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ घालण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन साहित्याचेही वाटप करण्यात आले. हे सर्व कार्य पाहून विद्यार्थी भारावून गेले. या सेवा कार्यात जवळपास ६०५ महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला होता. दिवसभर सेवेकरी आश्रमशाळेत थांबून विद्यार्थ्यांची विचारपूस करीत होते. विद्यार्थ्यांनी संस्कारांचे धडे, मराठी संस्कृती कशी टिकवावी याबद्दल माहिती देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात आपली मराठी संस्कृती व संस्काराचे गुण अंगीकारले पाहिजे. प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करावी, शालेय शिक्षक आपले गुरू असून गुरूंनी दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेऊन आपले उज्वल भविष्य घडविले पाहिजे, असे विध्यार्थ्यांना सांगण्यात आले. या वेळी गुरूमाऊली परिवार नंदुरबार केंद्रातील सेवेकरी, आश्रमशाळेतील अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: One-day parenting of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.