मुलगी पळवून नेण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:44 PM2019-05-27T12:44:06+5:302019-05-27T12:44:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलगी पळवून नेल्यानंतर त्याचा जातीरिवाजानुसार झगडा भरण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू ...

One killed in the assassination case | मुलगी पळवून नेण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मुलगी पळवून नेण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलगी पळवून नेल्यानंतर त्याचा जातीरिवाजानुसार झगडा भरण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना साव:यादिगर, ता.धडगाव येथे घडली. दुस:या गटानेही फिर्याद दिली आहे. गावात तणावपुर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला  आहे. 
अकिल मोती पावरा (27) रा.सिंधीदिगर, ता.धडगाव असे मयताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार साव:या दिगर येथील दिलीप राडय़ा पावरा याने मोटला मोती पावरा यांची मुलगी पळवून नेली होती. त्याचा जातीरिवाजानुसार झगडा भरण्यासाठी बैठक बसविली. परंतु त्यात समझोता न होता वाद झाल्याने मारहाण झाली. सिंधी दिगर येथील अकिल मोती पावरा (27) रा.सिंधीदिगर याच्यावर जमावाने हल्ला चढविला. डोक्यावर लोखंडी पाईपने वार केला. त्यात त्यांला वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर मोटला मोती पावरा, अरमिल मोटला पावरा, रा.भमानी, ता.धडगाव हे जखमी झाले. जमावाने दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण केली. लाठय़ा, काठय़ांचाही मारहाणीत वापर करण्यात आला. 
याबाबत मोटला मोती पावरा यांनी फिर्याद दिल्याने आपसिंग भारता पावरा, राडय़ा भारता पावरा, सुकल्या भारता पावरा, संदीप राडय़ा पावरा, दिलीप राडय़ा पावरा सर्व रा.साव:यादिगर, ता.धडगाव यांच्याविरुद्ध खून आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक निळे करीत आहे. 
दुसरी फिर्याद शिवल्या मोद्या पावरा, रा.साव:या दिगर यांनी फिर्याद दिली. झगडा भरण्यावरून वाद होऊन जमावाने हल्ला केल्याचे म्हटले आहे.  मोटला मोती पावरा, अरमिल मोटला पावरा दोन्ही रा.भमाने, अकिल मोती पावरा, रा.सिंधीदिगर व इतर तीन ते चार जणांनी घरात घुसून संसार उपयोगी सामानाची नासधूस केली. लाकडी दांडक्याने मारून जखमी केले.  या मारहाणीत राडय़ा भारता पावरा, जहांगिर इताम पावरा हे जखमी झाले.   तपास फौजदार सोनवणे करीत    आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे , सहायक पोलीस निरिक्षक निळे यांनी घटनास्थळी भेट दिली. गावात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. 
संशयीतांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक पाठविले आहे.  

Web Title: One killed in the assassination case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.