कुडीबारपाडात शेतीच्या वादातून एकाचा खुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:32 AM2019-03-16T11:32:08+5:302019-03-16T11:32:28+5:30
भाऊ जखमी : मोलगी पोलिसात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेताच्या वादातून एकावर कुºहाडीने वार करून ठार मारल्याची घटना डनेलचा कुडीबारपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुमा बामण्या वळवी (३५) रा.डनेलचा कुडीबारपाडा, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. संशयीत आरोपी कुमजी देवजी पाडवी व खुमा बामण्या पाडवी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शेतीचा वाद होता. या वादातून १३ रोजी कुमजी पाडवी याने खुमा व त्यांचा भाऊ सोन्या वळवी यांच्यात वाद झाला. कुमजी याने शिविगाळ करीत खुमा यांच्यावर कुºहाडीने वार केला. त्यांचा भाऊ सोन्या वळवी यांना देखील दगडाने मारून जखमी केले.
याबाबत सोन्या वळवी यांच्या फिर्यादीवरून कुमजी देवजी पाडवी याच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास फौजदार कचरे करीत आहे. घटनास्थळी उपअधीक्षक प्रकाश मेढे करीत आहे. संशयीतास लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.