दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:42 PM2019-11-30T12:42:26+5:302019-11-30T12:42:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा व शहादा तालुक्यात दोन वेगवेगगळ्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची ...

One killed, nine injured in two accidents | दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी

दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा व शहादा तालुक्यात दोन वेगवेगगळ्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. 
पहिली घटना धडगाव-तळोदा रस्त्यावर कोठारनजीक मजूर घेवून जाणारा टेम्पो उलटल्याने आठजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जखमी झालेल्यांमध्ये इरा सुडय़ा वसावे (55), दारज्या गुज:या वळवी (35), पिंटय़ा दारज्या वळवी (15), मेहंदी इरा वळवी (45), कविता जेरमा वसावे (18), सांगली दिवाल्या वळवी (21), कविता फेंदा वळवी (21), बुटी जुन्या पाडवी (36) सर्व रा.त्रिशुल, ता.तळोदा यांचा समावेश आहे. धडगावकडून तळोदाकडे येणारा मालवाहू मिनी टेम्पो भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अचानक उलटला. अंधारामुळे आणि मोबाईल रेंजच्या अभावी जखमींना लवकर मदत मिळू शकली नाही. अशोक जुन्या पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक वामन हु:या वसावे, रा.त्रिशुल याच्याविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वसावे करीत आहे.
युवक ठार
दुसरी घटना शहादा-धडगाव रस्त्यावर म्हसावदनजीक घडली. भरधाव मालवाहू टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना म्हसावद फाटय़ावर गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली.
अमित लक्ष्मण पाडवी (26) रा.जमाना, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. शहादाकडून धडगावकडे जाणारा मिनी टेम्पोने म्हसावद फाटय़ाजवळ समोरून येणा:या दुचाकीला कट मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. त्यात अमित पाडवी हा युवक जागीच ठार झाला. तर गौरवकुमार मोतीराम वळवी (26) हा युवक जखमी झाला. टेम्पो चालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करीत आहे.

Web Title: One killed, nine injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.