तळोद्यानजीक अपघातात एक ठार, तीनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:22 IST2019-11-11T12:22:33+5:302019-11-11T12:22:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना तळोदा ...

तळोद्यानजीक अपघातात एक ठार, तीनजण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना तळोदा वळण रस्त्यावर रविवारी सायंकाळी घडली. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नटवर देहरा पावरा (20) रा.शेलकुई, ता.धडगाव हा युवक जागीच ठार झाला तर गुरुदेव मोच:या पावरा (20) रा. बिलगाव ता. धडगाव, रविन्द्र मोरे (22) रा. निंभोरा ता. कुकरमुंडा, विजय जत्र्या पावारा (19) रा. शेलकुई ता. धडगाव असे जखमी युवकांचे नाव आहे. चारही युवक हे आपल्या दोन दुचाकींवरून जात होते. तळोदा वळण रस्त्यावर कोल डेपो जवळ या युवकांच्या मोटरसायकली एकमेकांना धडकल्या. यात दोन्ही दुचाकींवरील चारही युवक रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. त्यात नटवर पावरा यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही जखमी युवकांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर तेथे एकच गर्दी झाली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. या मार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच आदिवासी युवा शक्तीचे कार्यकर्ते विनोद माळी, विवेक ठाकरे, चेतन शर्मा, अभय वळवी व डॉ महेंद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तातडीने आपल्या खाजगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.श