वाळू वाहणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:26 PM2020-01-06T12:26:03+5:302020-01-06T12:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू वाहतूक करणाºया ट्रकने दिलेल्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारा एकजण जागीच ठार झाल्याची घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाळू वाहतूक करणाºया ट्रकने दिलेल्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारा एकजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे साडेसहा वाजता शहरातील कृषी महाविद्यालयासमोर घडली़ अपघात घडल्यानंतर भरधाव वेगातील ट्रक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकल्याने ट्रकमध्ये झोपलेल्या सहचालकाचाही मृत्यू झाला़
भटू मोतीराम चौधरी (५९) असे मयताचे नाव असून ते शहरातील गवळीवाडा भागातील रहिवासी आहेत़ चौधरी हे नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते़ धुळे रस्त्यावर कृषी महाविद्यालयापर्यंत जाऊन ते परत येत असत़ साडेसहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्याकडे पायी चालत असताना त्यांना मागून येणाºया एमएच २० ईजी ५६५५ या ट्रकने जोरदार धडक दिली़ बेफाम वेगातील ट्रक चौधरी यांच्या अंगावरुन थेट कृषी महाविद्यालय प्रवेशद्वारावर आदळला़ यातून प्रवेशद्वाराचा एक भाग ट्रकच्या केबीनवर कोसळून यामुळे आत झोपलेला सहचालक सुभाष शेरे (२८) रा़ वैजापूर जि़औरंगाबाद हा गंभीर जखमी झाला होता़ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मयत घोषित करण्यात आले़ अपघातानंतर परिसरातून जाणाºया युवकांनी मयत भटू चौधरी यांची ओळख पटवून दिल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांसह पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली़
याबाबत कांतीलाल मोतीराम चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन एमएच २० ईजी ५६५५ वरील अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल चुनीलाल ठाकरे करत आहेत़
भरधाव वेगात धुळ्याकडे जाणारा ट्रक हा वाळूने भरलेला होता़ पहाटेच्यावेळी चालकाने मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्याने हा प्रकार घडला असल्याचे रस्त्यावरुन सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे़ रविवार असल्याने महाविद्यालय प्रवेशद्वारावर विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़
अपघातानंतर धुळे चौफुली ते कृषी महाविद्यालय या दरम्यान वाहनांच्या वेगाची मर्यादा ही अधिक असल्याने प्रशासनाने यामार्गावर गतीरोधक टाकण्याची मागणी करण्यात आली होती़ परंतू त्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही़
अपघातात मयत झालेले भटू चौधरी हे शहरातील गवळीवाडा भागातील रहिवासी होते़ काही महिन्यांपूर्वीच वीज वितरण कंपनीतून ते लाईनमन म्हणून निवृत्त झाले होते़ रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते एकटे वॉकसाठी निघाले होते़ धुळे चौफुलीच्या पुढे गेल्यानंतर हा अपघात झाला़ मयत चौधरी हे परिसरात रनाळेकर म्हणून परिचित होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे़ त्यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या कुटूंबांचा आक्रोश मन हेलावणारा होता़
४अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरुन पळून गेला़ होता़ अपघातात एकच मयत असल्याची माहिती पोलीसांना होती़ सकाळी पोलीस पथक ट्रकची तपासणी करत असताना आत सहचालक असलेला सुभाष शेरे हा गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडल्याचे दिसून आल्यानंतर त्याला बाहेर काढून रुग्णायलयात हलवण्यात आले़
४अपघातानंतर शहरातून होणाºया वाळू वाहतूकीचा प्रश्न समोर आला आहे़ १० ते १२ चाकी ट्रक मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे़ यामुळे तळोदा रोड, बायपास, ट्रकटर्मिनस, धुळे चौफुली या परिसरातून मार्गक्रमण करणारे नागरिक जीवमुठीत धरुन प्रवास करतात़ ढंपर आणि वाळू वाहतूक करणारे मोठे ट्रक यांची एकाचवेळी वाहतूक सुरु असतानाही आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही़ गुजरातमधून नंदुरबार मार्गाने जाणारी ही वाहने परवानाधारक आहेत किंवा नाही, याचीही माहिती विभागांना नाही़