दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:21 PM2020-12-10T13:21:10+5:302020-12-10T13:21:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. लाल दिव्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. लाल दिव्याच्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातप्रकरणी तब्बल २० दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील विजापूर गावाच्या नदीफळी भागात ट्रॅक्टरचा अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला. विकास लाजरस गावीत (१८) रा.धुळीपाडा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. विकास हा विनापासींगचे ट्रॅक्टर घेऊन नदीकाठावरील आजोबांच्या शेतात नांगरणीचे काम करीत होता. ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने शेतीलगतच्या उतारावरून ट्रॅक्टर घसरून उलटले.
दुसरी घटना सारंगखेडा पुलावर घडली. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भरधाव वेगातील लाल दिव्याच्या वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. त्यात दोन जण जखमी झाले होते. ज्ञानेश्वर रमेश साळुंखे व आनंदा पंढरीनाथ पानपानटील, रा.उधना, सुरत असे जखमींची नावे आहेत. भरधाव आलेल्या लाल दिव्याच्या वाहनाने (क्रमांक एमएच १९ एम ०४७०) दुचाकीला (जीजे १९-९८५५) जबर धडक दिली. २० दिवसानंतर ज्ञानेश्वर साळुंखे यांनी फिर्याद दिल्याने सारंगखेडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.