एक लाखाची गावठी दारू व साधने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:57 PM2017-08-30T12:57:33+5:302017-08-30T13:02:14+5:30
मोहिम : गुन्हे शाखेची जिल्ह्यातील विविध भागात कारवाई
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 30- जिल्ह्यात सण उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध दारूविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आह़े याअंतर्गत मंगळवारी पथकाने जिल्ह्यात कारवाई करत एक लाख आठ हजाराची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला़
पथकाने शहादा तालुक्यातील फत्तेपूर गावात दोन ठिकाणी छापा टाकून 59 हजार 400 व 34 हजार 200 रूपये किमतीचे एकूण 50 लीटर क्षमता असलेले मातीचे 38 माठ, 200 लीटर क्षमतेचे प्लास्टिकचे 12 ड्रम त्यात एकूण चार हजर 300 लीटर गावठी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी लागणारा महूफुलांचा वॉश, मोटारीचे सात टय़ुब, 370 लीटर दारू असा 93 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याठिकाणाहून राजू दिनू ठाकरे व विनोद जामा ठाकरे या दोघांना अटक करण्यात येऊन म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिवदे, विनोद जाधव, जगदीश पवार, किरण पावरा, मोहन ढमढेरे यांनी केली़
नंदुरबार तालुक्यातही कारवाई
नंदुरबार शहरालगत पातोंडा गावात व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गिरीविहार परिसरात तीन ठिकाणी कारवाई करण्यात येऊन 14 हजार 400 रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली़ याप्रकरणी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात दोन जण व उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पाच गुन्ह्यांमध्ये एकूण एक लाख 8 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला केला़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आह़े