नंदुरबार येथील महा आरोग्य शिबिरात एक लाख 30 हजार रूग्णांची नोंदणी
By admin | Published: April 30, 2017 02:04 PM2017-04-30T14:04:09+5:302017-04-30T14:04:09+5:30
तळोदा रस्त्यालगतच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात एक लाख 30 हजार रूग्णांची पहिल्या सत्रात नोंदणी झाली
Next
नंदुरबार,दि.30- शहरातील तळोदा रस्त्यालगतच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात एक लाख 30 हजार रूग्णांची पहिल्या सत्रात नोंदणी झाली होती़ रूग्ण आणि त्यांच्या अभूतपूर्व गर्दी झालेल्या या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी रूग्णांच्या तपासण्या केल्या़
जिल्हा नियोजन समितीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराला सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती़ विविध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातील रूग्णांनी याठिकाणी उपस्थिती दिली़ मुंबई येथील सर ज़ेज़ेरूग्णालयाचे प्रमुख डॉ़ तात्याराव लहाने यांच्यासह राज्याच्या विविध भागातील तज्ञ डॉक्टर शिबिरात रूग्णांच्या तपासण्या करण्यासाठी हजर झाले होत़े रूग्णांकडून नोंदणी कक्षात नाव नोंदणी झाल्यानंतर सहा विविध डोममध्ये उभारलेल्या तपासणी कक्षात तपासण्या करण्यात येत होत्या़ मुख्य मंचाच्या मागील बाजूस उभारलेल्या शस्त्रक्रिया कक्षांमध्ये नोंदणी, त्यापलीकडे कक्षात जेनेरिक औषधे वाटप करण्यात येत होत़े दिव्यांग, दुर्धर आजार जडलेले, विविध विकारांनी पिडीत तसेच लहान बालक आणि महिलांच्या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या़ डॉ़ लहाने याच्यांकडून सकाळी 10 ते दुपारी 12 या काळात तब्बल एक हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली़
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, रूग्णमित्र रामेश्वर नाईक, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्यासह विविध मान्यवर याठिकाणी उपस्थित होत़े
प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर्स, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या पोलीस कर्मचारी सकाळी आठ वाजेपासून याठिकाणी तैनात करण्यात आले होत़े शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी 1 लाख 65 हजार रूग्णांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती़