कला अकादमीसाठी एक लाखाची देणगी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:06 PM2020-01-21T12:06:50+5:302020-01-21T12:06:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात कला अकादमी स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव असून त्यासाठी ...

One lakh donation for Arts Academy announced | कला अकादमीसाठी एक लाखाची देणगी जाहीर

कला अकादमीसाठी एक लाखाची देणगी जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात कला अकादमी स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव असून त्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळातर्फे एक लाख ११ हजार रुपयांची देणगी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी जाहीर केली.
युवारंगचा समारोप व पारितोषिक वितरण सोमवार झाले. त्यावेळी पाटील यांनी ही देणगी जाहीर केली. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहूलीकर होते. या वेळी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलताई पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रमोद पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, प्राचार्य आर.एस. पाटील, जि.प. सदस्या जयश्री पाटील, उपप्राचार्य डॉ.एन.के. पटेल, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, ईश्वर पाटील, सातपुडा साखर कारख्यान्याचे उध्दव पाटील, अधिसभा सदस्य मनिषा चौधरी, दिनेश नाईक, दिनेश खरात, डॉ.सत्यजित साळवे, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य बी.के. सोनी, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, प्राचार्य डॉ.डी.एम. पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल. पाटील, प्राचार्य जे.आर. पाटील मंचावर उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दीपक पाटील म्हणाले की, पाच दिवसात विद्यार्थ्यांनी विविध रंग संस्कृतीची मुक्त उधळण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ही संस्था शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी हा महोत्सव म्हणजे स्त्री-पुरुष समतेचे प्रतिक असल्याचे सांगून विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. विद्यापीठात कला अकादमी स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे प्रा.माहूलीकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले. हाच धागा पकडून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी विद्यापीठाने शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा न करता ही अकादमी सुरु करावी असे सांगून संस्थेच्या वतीने एक लाख ११ हजार रुपयांची देणगी या अकादमीसाठी जाहीर केली.
तर युवारंग सप्टेंबर महिन्यात घेऊ
युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यापीठाचा हा महोत्सव सप्टेंबर महिन्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले.
कमलेश महाले, सचिन चौधरी, नमिता पाटील व माधुरी पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर संघ व्यवस्थापकांच्या वतीने डॉ.एच.पी. खोडके, प्रा.योगीता चौधरी व प्रा.उर्मिला वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.विजयप्रकाश शर्मा तर आभार उपप्राचार्य डॉ.एन.के. पटेल यांनी मानले.

Web Title: One lakh donation for Arts Academy announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.