पैशांच्या वादातून एकास आमलाड येथून पळवून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:33 PM2018-08-18T12:33:25+5:302018-08-18T12:33:31+5:30
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील मालदा येथील एकास पैश्याच्या वादातून पाच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ पळवणा:या पाचही संशयितांचा पोलीसांकडून शोध सुरू आह़े
काशिनाथ कागडा वळवी (40) रा़ मालदा हे मजूरांचे मुकादम म्हणून काम करत असल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार या व्यवसायातील काहींसोबत होत होत़े यात अडीच लाख रूपये घेणे असल्याचे सांगून गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा अज्ञात चार व्यक्तींनी जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल़े काशिराम वळवी हे तळोदा येथून बोरद मार्गाने मालदा येथे जात असताना हा प्रकार घडला़ संबधितांनी वळवी यांना वारंवार फोन करून त्यांच्यासोबत चर्चा केल्याचेही सांगण्यात आले आह़े याबाबत रामसिंग सुरसिंग ठाकरे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े पैशांच्या वादातून झालेल्या या प्रकारामुळे वळवी यांचे कुटूंबिय भितीत आहेत़ पोलीसांकडून नंदुरबार जिल्ह्यासह ठिकठिकाणी माहिती घेऊन चौकशी करण्यात येत आह़े