पैसे परत मागितल्याने तळोदा तालुक्यातील रानमहूत एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:20 PM2019-03-01T12:20:14+5:302019-03-01T12:20:48+5:30
संशयितास अटक : रानमहू येथील घटना
नंदुरबार : रानमहू ता़ तळोदा येथे उसनवार दिलेले २०० रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती़ याप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली आहे़
रानमहू येथील दमण्या जेगल्या वसावे (४१) याने भरत खेत्या वसावे यास २०० रुपये उसनवार दिले होते़ सोमवारी दुपारी त्यांनी भरत याच्याकडून पैसे परत मागितले असता, त्याने वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली़ लाकडी खाटेचा दांडा व धाऱ्या या शस्त्राने मारहाण केल्याने दमण्या वसावे हे गंभीर जखमी होऊन मृत झाले़ त्यांच्या घराजवळच ही घटना घडली़ याबाबत विरजी जेगल्या वसावे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन भरत वसावे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़
तपास पोलीस निरीक्षक एऩएस़चव्हाण करत आहेत़ दरम्यान पोलीसांनी बुधवारी रात्री उशिरा संशयित आरोपी भरत वसावे यास रानमहू येथून अटक केली होती़