कारवर दुचाकी आदळून एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:40 PM2020-12-22T12:40:19+5:302020-12-22T12:40:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कारने अचानक वळण घेतल्याने दुचाकीत्यावर धडकून एकजण जागीच ठार झाल्याची घटना वाटवी, ता.नवापूर येथे ...

One person was killed on the spot when his bike collided with a car | कारवर दुचाकी आदळून एकजण जागीच ठार

कारवर दुचाकी आदळून एकजण जागीच ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  कारने अचानक वळण घेतल्याने दुचाकीत्यावर धडकून एकजण जागीच ठार झाल्याची घटना वाटवी, ता.नवापूर येथे घडली. याबाबत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधू दिवजन वसावे (६०)रा.घोगलपाडा, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. तर जालमसिंग जेश्या पाडवी हे जखमी झाले. जालमसिंग पाडवी व मधू वसावे हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ एए ६७६३) जात असतांना वाटवी गावाच्या वळणावर भरधाव आलेल्या पांढऱ्या कारने अचानक वळण घेतले.  त्यामुळे दुचाकी त्यावर धडकल्याने मागे बसलेले मधू वसावे हे फेकले जाऊन जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर जालमसिंग हे जखमी झाले.  याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Web Title: One person was killed on the spot when his bike collided with a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.