सातपुड्याच्या उंच डोंगरावर गवत कापण्यासाठी गेलेल्या एकाचा दरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:45 AM2017-10-24T05:45:48+5:302017-10-24T05:45:52+5:30
नंदुरबार : सातपुड्याच्या उंच डोंगरावर गवत कापण्यासाठी गेलेल्या खाअल्या चांद्या वसावे (५०, रा. खुर्चीमाळी ता. अक्कलकुवा) याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना वाल्हेरी (ता. तळोदा) परिसरात घडली.
नंदुरबार : सातपुड्याच्या उंच डोंगरावर गवत कापण्यासाठी गेलेल्या खाअल्या चांद्या वसावे (५०, रा. खुर्चीमाळी ता. अक्कलकुवा) याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना वाल्हेरी (ता. तळोदा) परिसरात घडली. १० दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडला होता. शनिवारी रात्री त्याचा मृतदेह आढळला.
सातपुड्याच्या दाट जंगलात रोहिसा हे सुगंधी गवत उगवते, विविध दुखण्यांवर गुणकारी असलेले हे गवत रात्रीच चमकते. त्यामुळे त्याची कापणी करण्यास ग्रामस्थ रात्रीचेच जातात. खाअल्या १२ आॅक्टोबरपासून वाल्हेरी शिवारात सातपुड्याच्या डोंगरात गवताच्या शोधासाठी गेला होता. आठ दिवस उलटूनही तो परत आला नाही. त्यामुळे मुलगा अनिल वसावे व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता शनिवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.