एक हजार दुकाने ऑनलाईन : नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:52 AM2018-02-28T11:52:03+5:302018-02-28T11:52:03+5:30

स्वस्त धान्य बायोमेट्रिकद्वारे : आजपासून पीओएसद्वारे वितरण

One thousand shops online: Nandurbar | एक हजार दुकाने ऑनलाईन : नंदुरबार

एक हजार दुकाने ऑनलाईन : नंदुरबार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पावणेतीन लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य 1 मार्च पासून ऑनलाईन पीओएस मशिनच्या माध्यमातून मिळणार आह़े यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडे दीड हजार पीओएस मशिन राज्य शासनाने पाठवून दिले होत़े 
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना ऑनलाईन करून तेथील धान्य पीओएस मशिनद्वारे देण्याचे नियोजन करण्यात आले होत़े यासाठी गेल्या दीड वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात पीओएस वापराची ‘रंगीत तालिम’ सुरू होती़ यात पुरवठा विभागाला 90 टक्के यश आले होत़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा हे दोन तालुके वगळल्यास इतर चार तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीओएस लावण्याचा प्रयोग यशस्वी झाला आह़े नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 52 दुकानांमध्ये पीओएस मशिन देण्यात आले होत़े गेल्या दोन महिन्यांपासून या पीओएसमध्ये लाभार्थीची माहिती संकलित करण्यात येत होती़ शिधापत्रिकांची माहिती, कुटूंबातील प्रत्येक लाभार्थीच्या अंगठय़ांचे ठसे, आधार क्रमांक आदी त्यात टाकण्यात आले आह़े यामुळे हे सर्व पीओएस मशिन ऑनलाईन काम करण्यास सज्ज झाले होत़े यात गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी सात पीओएस नादुरूस्त झाल्यानंतर ते दुरूस्तीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत़ तर उर्वरित 1 हजार 37 पीओएस मशिन ऑनलाईन झाले आहेत़ 
नंदुरबार तालुक्यात 55 हजार 589, नवापूर 48 हजार 591, शहादा 60 हजार 487, तळोदा 25 हजार 835, अक्कलकुवा 38 हजार 167 तर धडगाव तालुक्यात 25 हजार 64 शिधापत्रिका आहेत़ एकूण 2 लाख 53 हजार 733 शिधापत्रिकांमधून 12 लाख 31 हजार 913 लाभार्थीना स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येत़े यासाठी नियुक्त स्वस्त धान्य दुकानांमध्ये लावलेल्या पीओएसच्या माध्यमातून आता एक रूपयाही न देता धान्याचे वितरण होणार आह़े
लाभार्थीना स्वस्त धान्य बायोमेट्रिक पद्धतीने देता यावे यासाठी आधारकार्डाचे लिंकिंग करण्यात आले आह़े अद्यापर्पयत जिल्ह्यातील 2 लाख 17 हजार 590 शिधापत्रिका ऑनलाईन झाल्या आहेत़ याद्वारे 8 लाख 81 हजार 381  कुटूंब लाभार्थींचे आधारकार्ड पीओएस मशिनसोबत संलगA झाल्याने अनेक समस्या दूर झाल्या आहेत़ विविध बँकांसोबतही पीओएस कनेक्ट होत असल्याने लाभार्थीच्या खात्यातून रक्कम वर्ग होण्यासही अडचणी येत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ऑफलाईन पद्धतीने पीओएस काम करणार आहेत़ 
 

Web Title: One thousand shops online: Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.