कांद्याची प्रति क्विंटल सात हजारी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:28 PM2019-12-03T12:28:37+5:302019-12-03T12:28:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये प्रथमच कांदा दर प्रति क्विंटल सात हजारावर पोहोचले आहेत़ सोमवारी ...

Onion is 7,000 bucks per quintal | कांद्याची प्रति क्विंटल सात हजारी भरारी

कांद्याची प्रति क्विंटल सात हजारी भरारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये प्रथमच कांदा दर प्रति क्विंटल सात हजारावर पोहोचले आहेत़ सोमवारी येथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांना हे दर मिळाल्याने कांदा चालू आठवडय़ातही तेजीत असल्याचे दिसून आले होत़े   
गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागलेल्या कांदा दर कमी व्हावेत यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आह़े या निर्णयामुळे सोमवारी सुरु होणा:या बाजारात कांदा दर कमी होण्याची शक्यता आह़े परंतू गेल्या आठवडय़ात कमी झालेले कांदा आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी वाढल्याचे दिसून आल़े नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सोमवारी दुपारी 300 कट्टे कांदा आवक झाली होती़ प्रामुख्याने लगतच्या गावांमधून ही आवक झाल्याची माहिती आह़े प्रारंभी या कांद्याला साधारण 4 हजार ते थेट सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आल़े हलक्या प्रतीचा कांदा 4 हजार रुपयांना व्यापारी खरेदी करत होत़े तर मध्यम प्रतीचा कांदा 4 हजार 500 ते 5 हजार रुपयांर्पयत खरेदी करण्यात आला़ यात कोणत्याही प्रकारचा ओलावा नसलेला कोरडा कांदा थेट सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येत होता़ कांद्याला मिळालेल्या या विक्रमी दरांमुळे येथे कांदा विक्रीसाठी सोमवारी दाखल झालेल्या शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला होता़ त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत होत़े 
बाजार समितीत प्रथमच कांद्याला एवढे दर मिळत असल्याची माहिती आह़े येत्या काही दिवसात बाजारात उन्हाळी कांद्याची आवक सुरु होणार असल्याची माहिती असून पूर्व भागातील गावांमध्ये तयार झालेले पीक काढण्याचे काम येत्या आठवडय़ापासून हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत़ यातून हे दर कमी होतात किंवा कायम राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आह़े
 

Web Title: Onion is 7,000 bucks per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.