कांदा उत्पादक गावावर आली खरेदीची आफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:26 PM2019-12-01T12:26:50+5:302019-12-01T12:26:58+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘कांदा’ कधी शेतक:याचा तर कधी ग्राहकांचा ‘वांदा’ करीत असतो. ‘कांदा’ने दिल्ली ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘कांदा’ कधी शेतक:याचा तर कधी ग्राहकांचा ‘वांदा’ करीत असतो. ‘कांदा’ने दिल्ली सरकार पाडल्याचाही इतिहास आहेच. असा हा ‘कांदा’ यंदा काही शेतक:यांची चांदी करून जात आहे. दुसरीकडे मात्र अतिपाऊस, वातावरणातील वारंवार झालेला बदल यामुळे उत्पादन अवघ्या 10 टक्क्यांवर आल्याची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादन घेणा:या ‘आसाणे’ गावातील कांदा उत्पादक शेतक:यांना यंदा कांदा विकत घेण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
खरीपातील कांदा उत्पादन यंदा कमी झाल्याने कांद्याचे भाव यंदा लक्षवेधी ठरत आहे. 50 ते 80 रुपये किलो दराने कांदा विक्री होत आहे. ज्या शेतक:यांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. परंतु काही शेतक:यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघाला नसल्याची स्थिती आहे. यामुळे बाजारात टंचाई निर्माण होऊन यंदा कांदा चांगलाच भाव खात असल्याचे चित्र देशभरात दिसून येत आहे. कांदा उत्पादन घेणा:या जिल्ह्यातील काही गावांमध्ये नंदुरबार तालुक्यातील आसाणे, घोटाणे, सैताणे, कार्ली, रजाळे, खर्दे, खोक्राळे, शनिमांडळ या गावांचा उल्लेख केला जातो. त्यातल्या त्यात आसाणे हे गाव कांदा लागवड आणि उत्पादनाबाबत नेहमीच ‘टॉप’वर असते. यंदा मात्र याच गावातील कांदा उत्पादक शेतक:यांना कांदा विकत घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
कांद्याला हलकी व मध्यम स्वरूपाची जमीन लागते. तालुक्यातील पूर्व भागातील आसाणेसह परिसरातील गावे ही अवर्षण प्रवण असल्यामुळे कमी पावसात या भागात कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पोषक जमिन आणि वातावरण राहत असल्यामुळे कांदा उत्पादनात हा परिसर नेहमीच अग्रेसर असतो. आसाणे गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या क्षेत्रापैकी किमान 50 क्षेत्रात तरी कांदा लागवड करतो. काही शेतकरी दोन्ही पीक हे कांदाच घेत असतो. या परिसरात नायलॉन, फुले समर्थ, रांगडा, डार्करेड आणि भिमा सुपर या वाणांची सर्वाधिक लागवड होते. त्यातल्या त्यात फुले समर्थ याला सर्वाधीक पसंती असते. लाल कांदा 90 टक्के तर पांढरा कांदा 10 टक्के लागवड केला जातो.
रासायनिक खतांची मात्रा कमी करून जास्तीत जास्त शेतकरी आता सेंद्रीय कांदा उत्पादनाकडे वळू लागले आहेत. यंदा मात्र तब्बल 140 टक्के पाऊस झाल्याने आणि जमिनीत सतत चार ते पाच महिने ओलावा राहिल्यामुळे कांदा जमिनीतच सडला. परिणामी उत्पादन अवघ्या 10 टक्क्यांवर आले आहे. यामुळे एकरी 50 ते 55 हजार रुपये खर्च करूनही उत्पादन हाती काहीच आले नसल्यामुळे शेतकरी कजर्बजारी झाला आहे.
आता रब्बीवर आशा असली तरी शेतक:याकडे कजर्बाजारीपणामुळे भांडवलच नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ज्या शेतक:यांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना चांगला भाव मिळत आहे. येथील कांदा हा इंदोरच्या बाजारात सर्वाधिक जातो. सध्या त्या ठिकाणी 60 ते 70 रुपये किलो दराने ठोक भावात कांदा खरेदी होत आहे.
बेभरोवशाचे गणित..
कांदा उत्पादन हे शेतक:यांच्या दृष्टीने बेभरोवशाचे गणित असा प्रकार असतो. एखाद्या वर्षी कांद्याला अपेक्षेपेक्षा अधीक भाव मिळून जातो तर कधीकधी कांदा फेकावा लागतो. आसाणे गावाला 2013 मध्ये कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झाले होते. त्यावेळी गावात आठ ते दहा ट्रॅक्टर व 40 पेक्षा अधीक दुचाकी खरेदी झाल्या होत्या असे गावातील काही जणांनी सांगितले. मात्र नंतरच्या वर्षी कांदा अक्षरश: मातीमोल भावात विकावा लागला. गाडीभाडे देखील निघत नव्हते अशी स्थिती झाली होती.