ऑनलाईन अर्ज भरणा:या शेतक:यांची फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:14 AM2017-09-04T11:14:07+5:302017-09-04T11:14:07+5:30

शासनाने लक्ष देण्याची अपेक्षा : इंटरनेट सेवेतील व्यत्ययाने चिंता

Online application form: This farmer: Tourists | ऑनलाईन अर्ज भरणा:या शेतक:यांची फिरफिर

ऑनलाईन अर्ज भरणा:या शेतक:यांची फिरफिर

Next
ठळक मुद्दे अर्ज भरण्यासाठी शेतक:यांच्या फे:या अर्ज भरण्यासाठी तळोदा येथील विविध केंद्रांसह गावागावातील संग्राम केंद्रांवर जाणा:या शेतक:यांचा अर्ज पहिल्या प्रयत्नात भरलाच जात नसल्याने अडचणी येत आहेत़ शेतकरी दोन ते तीन फे:या मारल्यानंतरच अर्ज भरणा होत आह़े बोर

 
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभाग घेणा:या शेतक:यांची
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रचंड फिरफिर होत आह़े वारंवार बंद पडणा:या इंटरनेट सेवेमुळे शेतक:यांचे हाल सुरू आहेत़ याकडे शासनाने लक्ष देण्याची अपेक्षा आह़े 
शेतक:यांना कजर्मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर सन्मान योजनेंतर्गत 15 सप्टेंबर्पयत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत़ हा अर्ज
भरताना आधार कार्ड, पीक कजर्दाराचे कर्ज क्रमांक, पॅन कार्ड या सर्व पुराव्यांची पूर्तता केल्यानंतर नोंदणी करण्यात येत आह़े नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यात
मात्र शेतक:यांना अडचणी येत आहेत़ महा-ई-सेवा केंद्र, संग्राम आणि आपले सरकार केंद्रात अर्ज भरणा होण्यास वेळ लागत आह़े एकच अर्ज सुरू असताना अचानक वीज
पुरवठा खंडीत होणे, इंटरनेट सेवा बंद होण्याचे प्रकार होत आहेत़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहेत़ अद्याप तळोदा तालुक्यातील अनेक शेतक:यांचे अर्ज भरणा
करण्याचे कामकाज अपूर्ण आह़े त्यात सुधारणा न झाल्यास मुदतीत अर्ज भरणा होणार नाही अशी भिती शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातील मोड
आणि बोरद या ठिकाणी परिसरातील गावांमधून शेतकरी येत आहेत़ मोड येथे नुकतेच 14 व्या वित्त आयोगातून सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आह़े याठिकाणी
सुसज्ज अशी यंत्रणा असली, तरी बंद पडणा:या इंटरनेट सेवेमुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत आह़े यामुळे शासनाने सुरू असलेल्या या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देण्याची
मागणी करण्यात आली आह़े
 

Web Title: Online application form: This farmer: Tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.